आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या मुख्य व्यक्तिमध्ये असावेत गणपती बाप्पासारखे गुण, तेव्हाच कुटुंब सुखी होईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन मंत्र डेस्क- भगवान गणेशला कुटुंबातील देवता मानतात. यांची पुजा सहकुटुंब केल्यास घरात सुख-समृद्धी आणि प्रेम वाढते. गणेशाच्या स्वरूपात आयुष्य जगण्याचे अनेक सुत्र आहेत, ज्यांना दैनंदिन जीवनात आत्मसात केल्यास, अनेक त्रासांपासून आपण मुक्त होऊ शकतोत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितल्यानुसार घरातील मुख्य व्यक्तीमध्ये गणेशासारखे गुण असावेत, तेव्हाच कुटुंबात आनंद पसरतो.

हत्तीप्रमाणे गंभीर स्वभाव असावा
पं. शर्मानुसार घरातील मुख्यव्यक्तीचा स्वभाव गंभीर असावा. गणपतीचे तोंड हत्तीप्रमाणे आणि धड मनुष्याप्रमाणे आहे, म्हणजेच व्यक्तीची बुद्धी हत्ती सारखी गंभीर असावी. घर-परिवारातील सर्व बाबींबर गांभीर्याने विचार करायला हवा. हत्ती विचार करुनच कोणतेही काम करतो. हत्तीला लवकर राग येत नाही. हत्तीप्रमाणे धैर्य आणि शांती ठेवावी.

गणपतीचे वाहन उंदीर आहे. उंदीर नेहमी लपून राहतो. जेव्हा भूक लागते, तेव्हाच तो बाहेर येतो आणि परत आत जातो. अशाप्रकारे घराच्या मुख्य व्यक्तीला आपल्या योजना आपल्यापर्यंतच ठेवाव्यात. नेहमी योजनेनुसार काम करावे. आपल्या योजना कोणलाच सांगू नका. 

बातम्या आणखी आहेत...