आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD : वडील होते सिक्युरिटी गार्ड, पण क्रिकेटने असे नशीब पालटवले की यालाच सगळे म्हणतात SIR

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आज ( 6 डिसेंबर) वाढदिवस साजरा करत आहे. अगदी गरीब कुटुंबातून आलेला हा क्रिकेटर आज सेलिब्रिटी बनला आहे. त्याला प्रेमाने क्रिकेट संघातील इतर सदस्य सर सरींद्र जडेजा म्हणतात. 


सिक्युरिटी गार्ड होते वडील
> रविंद्र जडेजाचा जन्म गुजरातचे एक छोटेसे गाव नवागाम येथे झाला. त्याचे वडील एक सुरक्षा रक्षक होते. तर आई नर्स होती. 
> घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने क्रिकेटर होण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. 
> जडेजाच्या आईची इच्छा होती की त्याने क्रिकेटर व्हावे. तर वडिल त्याला संरक्षण दलात पाठवण्याची तयारी करत होते. 
> 2005 मध्ये जडेजाच्या आईचे अपघाती निधन झाले. त्याच्या आयुष्यातील तो सर्वात मोठा मानसिक धक्का होता. क्रिकेटपासूनही तो दुरावला होता. 
> यानंतर त्याच्या बहिणींनीच त्याला परत खेळण्याची प्रेरणा दिली. आज तो स्टार इंडियन क्रिकेटर आहे. त्याच्या दोन्ही बहिणी आता रेस्टॉरंटचा बिझनेस सांभाळतात.


जडेजाकडे आहेत 2 Audi...
जडेजाकडे 2 ऑडी कार आहेत. त्यापैकी एकिची किंमत 97 लाख असून ती त्याच्या सासऱ्यांनी दिली होती. त्याआधी त्याच्याकडे ऑडी क्यू-3 कार होती. जडेजाच्या फार्म हाऊसवर घोडेदेखिल आहेत.


अशी झाली सुरुवात
जडेजाला 2002 मध्ये सर्वप्रथम सौराष्ट्रच्या अंडर-14 टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र विरोधात 87 धावा करून त्याने 4 विकेटही घेतल्या होत्या. 15 वर्षांचा असताना त्याची सौराष्ट्राच्या अंडर-19 टीममध्ये निवड झाली. याच फॉरमॅटमध्ये त्याने करिअरचे पहिले शतक लावले. यानंतर 2005 मध्ये त्याची अंडर-19 वर्ल्ड कपसाठी निवड झाली. 2009 मध्ये त्याने वनडे आणि टी-20 डेब्यू केला. तर 2012 मध्ये त्याने आपल्या करिअरचा पहिला टेस्ट सामना खेळला. आज तो भारताच्या सर्वोत्त अष्टपैलू क्रिकेटपटुंमध्ये आघाडीवर आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...