आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामतीर्थांचा आत्मसाक्षात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामतीर्थ नेहमी ‘थर्ड पर्सन’ म्हणजे अन्य व्यक्तीच्या नावाचा उच्चार करून संबोधन करत असत. त्यांना भूक जरी लागली तर ते म्हणत असत, रामाला भूक लागली आहे. मला भूक लागली आहे, असे चुकूनही म्हणत नव्हते. एका रात्री त्यांना खूप थंडी वाजत होती. तेव्हा सकाळी उठून ते म्हणाले, रात्री खूप बरे वाटले, पण राम रात्रभर थंडीत कुडकुडत होता. जर कोणी त्यांना अपशब्द वापरला तर ते म्हणत, रामने काल खूप बोलणी खाल्ली आहेत. तो बोलणे खात होता आणि मी गंमत पाहत होतो. अमेरिकेत प्रवास करताना एकदा त्यांनी पाणी मागताना म्हटले, रामला तहान लागली आहे. तेथील लोक राम नावाच्या व्यक्तीला शोधू लागले. मग त्यांना हळूहळू समजू लागले. एकदा तेथील प्राध्यापकांनी विचारले, जेव्हा तुम्ही म्हणता, रामला भूक लागली. मग तुम्हाला लागत नाही का? स्वामीजी म्हणाले, मला फक्त कळते. रामला काय पाहिजे आहे, हे मी जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतो. मी आणि माझा आत्मा रामपासून स्वतंत्र आहे. जेव्हा ही जाणीव अधिक गहिरी होत जाते तेव्हापासून आपलेपण सुटू लागते. त्यालाच आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो. परमेश्वरप्राप्तीसाठी याचीच आवश्यकता आहे.