आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वदेशी बनावटीच्या तेजसची आयएनएस विक्रमादित्यवर यशस्वी अरेस्टेड लँडिंग, लढाऊ जहाजावर उतरणारे देशातील पहिले विमान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीआरडीओनुसार, कमांडर जयदीप मावलंकरने अरेस्टेड लँडिंग केली
  • या लँडिंगनंतर नौसेनेकडे डबल इंजिन तेजस विकसीत करण्याचा मार्ग मोकळा झाला

नवी दिल्ली- स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान तेजसने शनिवारी पहिल्यांदा नौसेनेचे एअरक्राफ्ट कॅरियर आयएनएस विक्रमादित्यवर यशस्वीरित्या अरेस्टेड लँडिंग केली. संरक्षण शोध आणि विकास संघटना (डीआरडीओ) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कमांडर जयदीप मावलंकरने ही यशस्वी लँडिंग केली. यामुळे नौसेनेची ऑन डेक ऑपरेशन क्षमता वाढेल.
या अरेस्टेड लँडिंगनंतर नौसेनेसाठी डबल इंजिन तेजस विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आयएनएसवर एखादे स्वदेशी बनावटीचे विमान लँड झाले आहे.

तेजसने सप्टेंबरमध्ये टेस्ट फॅसिलिटीमध्ये लँडींग केले होती

तेजसने 13 सप्टेंबर 2019 ला नौसेनेत सामील  होण्यासाठी मोठे परिक्षण केले होते. डीआरडीओ आमि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजेंसीच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या किनारपट्टीवरील टेस्ट फॅसिलिटीमध्ये तेजसची अरेस्टेड लँडिंग केली होती. तेजस असे करणारे देशातील पहिले युद्ध विमान आहे. या युद्ध विमानाला हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजंसीने डिझाइन आणि विकसित केले आहे. तेजस भारतीय वायुसेनेच्या 45 व्या स्क्वाड्रन ‘फ्लाइंग ड्रॅगर्स’ चा भाग आहे.

काय आहे अरेस्टेड लँडिंग? 

नौसेनेत सामील होण्यासाठी विमानाला दोन परिक्षण पास करणे गरजेचे आहे. यात एक म्हणजेच त्यांचे हलके असणे आणि दुसरे म्हणजे अरेस्टेड लँडिंग. अनेकवेळा नौसेनेच्या विमानांना युद्धनौकेवर लँड करावे लागते. युद्धपोत एक ठराविक वजन उचलू शकते, त्यामुळे विमानांचे हलके असणे महत्वाचे आहे. याशिवाय युद्धनौकेवरील रनवे लहान असल्यामुळे विमानाला लँडींग करताना वेग कमी करावा लागतो. याला अरेस्टेट लँडिंग म्हणतात.