• Home
  • National
  • Lightning struck while bringing idol of Ganapati, 2 dead and 5 seriously injured

National / गणपतीची मूर्ती आणतेवेळी लागला विजेचा जोरदार झटका, 2 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी

मूर्ती नेताना बांबूच्या काठीने विजेची तार बाजुला केली जात होती

Aug 29,2019 12:31:39 PM IST

भरूच(गुजरात)- गणपतीची मूर्ती आणतेवेळी विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वरमध्ये अपघात घडला. अंकलेश्वरच्या आदर्श मार्केटमध्ये बुधवारी(28 ऑगस्ट) गणपतीची मूर्ती आणत असताना वरील विजेच्या तारेशी संपर्क झाल्याने सात जणांना विजेचा जोरदार धक्का लागला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


अंकलेश्वरच्या आदर्श मार्केट येथील एका ठिकाणी गणेशाची 26 फुटांची मूर्ती नेली जात होती. मूर्ती नेत असताना एक जण विजेची तारं बांबूने बाजुला करत होता, यावेळी तरुणांना विजेचा जोरदार धक्का लागला. पावसाचे वातावरण असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात अमित आणि कुणा नावाच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

X