आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - रेल्वे प्रवासादरम्यान आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मनोरंजनासाठी व्हिडिओ, चित्रपट आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही सुविधा सर्व प्रीमियम, एक्स्प्रेस आणि मेल रेल्वेगाड्यांमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. यात विविध भाषांमधील चित्रपट, मनोरंजनाचे कार्यक्रम, लाइफस्टाइलशी संबंधित साहित्य उपलब्ध असणार आहे.
प्रवाशाने मागणी केल्यास त्यांच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर ही सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सेवा सशुल्क आणि नि:शुल्क अशा दोन्ही पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या नव्या सुविधेमुळे कोणतीही भाडेवाढ न करता रेल्वेचा महसूल वाढण्याची अपेक्षा आहे. रेल्वेला सबस्क्रिप्शन आणि जाहिरातीच्या माध्यमातून महसूल मिळेल. ही योजना २०२२ पर्यंत अमलात येईल.
रेलटेलवर सोपवली जबाबदारी
मनोरंजनाची सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंडळाने रेल्वेच्या अखत्यारीतील कंपनी रेलटेलला जबाबदारी सोपवली अाहे. रेलटेलने यासाठी झी एंटरटेनमेंटची उपकंपनी मार्गो नेटवर्कसोबत दहा वर्षांचा करार केला आहे. मार्गो नेटवर्क डिजिटल मनोरंजन उपलब्ध करून देईल. देशात धावणाऱ्या ८ हजार ७३१ रेल्वे गाड्यांपैकी ५ हजार ७२८ रेल्वे गाड्यांमध्ये ही योजना लागू केली जाणार आहे. यात ३ हजार ३ प्रीमियम, मेल, एक्स्प्रेस आणि २ हजार ८६४ उपनगरी रेल्वे गाड्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.