आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर मोठ्या भावासारखा, त्याला कधीच माझ्याकडून त्रास झाला नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणवीरला भीती वाटत असल्याच्या अफवेबाबत बोलला सिद्धांत
  • सिद्धांतच्या हातात यशरात बॅनरचा मोठा चित्रपट ‘बंटी और बबली 2’देखील लागला आहे

बॉलिवूड डेस्क - ‘गली बॉय’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या सिद्धांत चतुर्वेदीला एकापाठोपाठ एक चित्रपट मिळत आहेत. तो इतका लोकप्रिय झाला की त्याच्याकडे निर्मात्यांची रांग लागली आहे. रणवीरलाही त्याची भीती वाटत असल्याची अफवा पसरली आहे.


याविषयी तो म्हणाला...,  या सर्व अफवा आहेत, असे काही नाही. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मी त्यांच्या गळ्यात पडून रडलो होतो. त्यांनीदेखील मोठ्या भावाप्रमाणे माझे कौतुक केले. शाब्बासकी दिली, लाला तुमने तो कमाल कर दिया, असे ते म्हणाले. ते मला प्रेमाने लाला म्हणतात. त्यांनी मला स्वत:चे उदाहरण देत सांगितले होते की, लोकांचे ऐकू नको. कारण ८ वर्षांपूर्वीदेखील असेच झाले होते, तेव्हा ‘बँड बाजा बारात’ रिलीज झाला होता.

इंडस्ट्रीत एक नवीन मुलगा आला हाेता. त्यावेळीदेखील रणवीर आल्यामुळे मोठे स्टार्स घाबरत असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.  त्यांनतर  ‘गली बॉय’चे प्रीमियर बर्लिनमध्ये झाले तेव्हा सर्वात आधी मला त्यांचा फोन आला. ते खूपच खुश होते. सर्व मुलाखतीत त्यांनी माझे नाव घेतले. त्यामुळे त्यांना माझ्यामुळे भीती वाटत असल्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. मी या गोष्टीला मानत नाही.


दुसरीकडे सिद्धांतच्या हातात यशरात बॅनरचा मोठा चित्रपट ‘बंटी और बबली 2’देखील लागला आहे. याविषयी तो म्हणाला, जेव्हा या चित्रपटाची घाेषणा झाली, तेव्हादेखील रणवीरने मला फोन करून वाह लाला, यशराजच्या चित्रपटात आला, असे म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या. ते स्वत:देखील यशराजच्या ‘जयेशभाई जोरदार’चे शूटिंग करत आहेत. ते माझ्या चित्रपटाच्या सेटवरदेखील येतात.त्यांना माझा खूप अभिमान वाटतो, जसे मोठ्या भावाला वाटतो. त्यांच्या मनात माझ्याविषयी असे काही असेल असे मला कधीच वाटत नाही, पुढेही जीवनात असे होणार नाही.