आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरप्रमाणेच आता शिक्षकांनाही गावात करावे लागेल काम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमितकुमार निरंजन

नवी दिल्ली  - डॉक्टरांच्या धर्तीवर आता उच्च शिक्षण संस्थेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनादेखील गावाशी संबंधित प्रकल्पांमध्ये काम करावे लागू शकते. असे करणाऱ्या शिक्षकांना पदोन्नतीमध्ये प्राधान्य दिले जाऊ शकते. प्रगत भारत अभियानाशी जोडलेल्या पाच हजार संस्थांमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल. 

मंत्रालय या निर्णयाचा विचार करत आहे. चार महिन्यांनंतर पुढील शैक्षणिक सत्राच्या आधी ही प्रक्रिया सुरू होऊ शकते. ग्रामीण भागाच्या विकासासाठी मनुष्यबळ मंत्रालयाने प्रगत भारत अभियान सुरू केले आहे. ज्याअंतर्गत आयआयटी, ट्रिपलआयटी, एनआयटी, एआयसीटीई आणि यूजीसीशी संबंधित महाविद्यालयांचे विद्यार्थ्यांना गावातील समस्यांवर काम करावे लागते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी इंटर्नशिपमध्ये क्रेडिट अंक देण्याची तरतूद केली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होऊ शकतो.