आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत कुत्र्यास हरवून 3 वर्षांचा बकरा झाला महापौर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन  - अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या वरमाँट भागात 3 वर्षांच्या बकऱ्याची महापौरपदी निवड करण्यात आली. यासंदर्भात माहिती अशी की, फेअर हवन गावात मंगळवारी निवडणुका पार पडल्या. यात 15 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उमेदवारांत कुत्रे, मांजरीसह विविध प्रजातींतील प्राण्यांचा समावेश होता. या सर्वांचा पराभव करत लिंकन नावाच्या बकऱ्याची महापौरपदी निवड झाली. 


सुमारे २५०० लाेकवस्तीच्या गावात अधिकृत असा महापौर नाही. परंतु या भागाचे व्यवस्थापक जोसेफ गुंटेर महापौरपदाची सर्व जबाबदारी सांभाळतात. गुंटेर यांनी सांगितले,  मिशिगनच्या ओमेना गावात प्रमुख म्हणून मांजरीला निवडले होते. त्यामुळे आम्हीसुद्धा निवडणूक घेण्याचे ठरवले. त्यानुसार लिंकनने सॅमी नावाच्या कुत्र्यास हरवून महापौरपद मिळवले.

बातम्या आणखी आहेत...