Home | National | Other State | Lingayat will be king maker in Karnatak in election

कर्नाटक: लिंगायत निर्णायक, भाजपवर नाराज, पारंपरिक मतदार देतील धक्का

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 16, 2019, 09:13 AM IST

तीन जागांवर हिंदू-मुस्लिम फॅक्टर, सर्जिकल स्ट्राइकसारख्या मुद्द्यांवर होणार मतदान

 • Lingayat will be king maker in Karnatak in election

  घोड्यावर बसलेला हाशिम, आदिलशहाच्या काळात बसलेल्या घरांकडे बोट दाखवत म्हणतो, ‘आज भी वैसा गारा नहीं बन पाया है, जो घरों को इतना मजबूती से जोड़ सके। राजनीति भी ऐसी ही है। कौमी एकता का गारा हर बार चुनाव आते-आते चटक जाता है।’ तिसरीपर्यंत शिकलेला हाशिम हिंदी, कन्नड, मराठी व इंग्रजीत बोलतो. आपल्या गप्पांमध्ये महाराष्ट्र-कर्नाटकातील राजकीय सत्य सांगतो. मतदान कोणाला करणार, या प्रश्नावर हाशिम म्हणाला, ‘जो आमच्याकडे लक्ष ठेवले, आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ.’ हाशिम याचे वक्तव्य पुढे नेत ‘द हिंदू’ या दैनिकातील राजकीय संपादक ऋषी बहादूर म्हणतात, महाराष्ट्र, कर्नाटक पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. बाबरी मशिदीच्या घटनेनंतर धारवाडच्या ईदगाह मैदानाने संपूर्ण राजकारण बदलून टाकले. अडीच दशकांपूर्वी भाजपने येथे झेंडा फडकवल्यानंतर भाजपने पाय रोवणे सुरू केले. धारवाडहून महाराष्ट्र-कर्नाटकमधील पहिली जागा जिंकल्यानंतर भाजपने दशकभरात संपूर्ण परिसरात दबदबा निर्माण केला.  चिकोडी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. येथे उसाचा भाव दरवेळेस निवडणुकीचा मुद्दा असतो. येथे मागील वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर पी.बी.हक्केरी निवडणूक जिंकले होते. त्यांना पुन्हा तिकीट दिले आहेे. लिंगायतला धर्माची मान्यता न मिळाल्याने हा समाज भाजपवर नाराज आहे. यामुळे काँग्रेसचा विजय सोपा होऊ शकतो. भाजपने अण्णासाहेब जोल्ली यांना तिकीट दिले आहे. राजकीय विश्लेषक आर उप्पार म्हणतात, मराठी आणि कन्नड हा मुद्दा येथे झाला आहे. चिकोडीला वेगळा जिल्हा बनवण्याची मागणी होत आहे.

  बेळगाव हा महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग आहे. भाजपने विद्यमान खासदार सुरेश अंगडी यांना पुन्हा तिकीट दिले आहे. भाजपच्या तिकिटावर ते तीन वेळा खासदार झाले आहेत. कर्नाटकमधील माजी मंत्री व्ही.एस. कोजलगी यांचे हे नातेवाईक आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा हा येथे प्रमुख मुद्दा आहे. येथील मराठी समाजाला बेळगावचा समावेश महाराष्ट्रात हवा आहे. तीन दशकांपासून हा गहन प्रश्न आहे. १९९६ मध्ये या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने ४५२ जणांना निवडणुकीत उतरवले होते. यंदाही समिती शंभर जणांना निवडणूक रिंगणात उतरवणार आहे. हा मराठी समाज भाजपशी जुळला आहे. यामुळे येथे भाजपच्या विजयाची शक्यता आहे.
  बागलकोटमध्ये मागील वेळेस भाजपने पी.सी.गड्डीगोडर यांना तिकीट दिले होते. ते विजयी झाले होते. यंदा पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. येथे ७० टक्के मते लिंगायत आहेत. काँग्रेसनेही लिंगायत समाजाच्या वीणा विजयानंद यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या तिकीट मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला उमेदवार आहेत.  विजापूरमध्ये मागील वेळेस भाजपचे रमेश चंदप्पा खासदार होते. यंदाही भाजपने त्यांनाच तिकीट दिले होते. मागील चार निवडणुकांत भाजपच येथून निवडून येत आहे. यंदा लढत संघर्षपूर्ण होऊ शकते. कारण केंद्रात मंत्री असल्यामुळे त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क ठेवला नाही. येथे ४० टक्के दलित, ४० लिंगायत आणि २० टक्के अल्पसंख्याक आहेत. मागील वेळेस दलित-मुस्लिम मते जेडीएस व काँग्रेसमध्ये विभागली गेली होती. यंदा दोन्ही एकत्र असल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

  धारवाडमधून भाजपचे प्रल्हाद व्यंकटेश मागील वेळेस खासदार झाले होते. भाजपने त्यांना पुन्हा तिकीट दिले आहे. यंदा हुबळी ईदगाह मैदानाचा मुद्दा बनला आहे. येथे लिंगायत ५५ टक्के, मुस्लिम २५ टक्के, ओबीसी १० टक्के आणि दलित १० टक्के आहेत. १९९४ मध्ये भाजप नेत्या उमा भारती यांनी सिकंदर बख्त यांच्याबरोबर ईदगाह मैदानावर तिरंगा फडकवला होता. त्यानंतर आतापर्यंत ही जागा भाजपकडेच आहे.

  हावेरी इलायचीसाठी ओळखले जाते. मागील वेळेस भाजपचे शिवकुमार चनबसप्पा खासदार झाले होते. यंदा पुन्हा ते निवडणूक लढत आहेत. येथे महदाई वॉटर प्रोजेक्टचा मुद्दा आहे.
  चिकमंगळूरमध्ये पोहोचल्यावर एक विलक्षण दृश्य दिसले. सहा हजार फुटांच्या उंचीवर बाबा बुडनगिरीचा दर्गा व दत्तात्रेय पीठ आहे. दोघांमध्ये फक्त दोन फुटांचे अंतर असेल. आश्चर्यकारक बाब म्हणजे बाबा बुडन आणि दत्तात्रेय एकाच व्यक्तीची दोन नावे आहेत. १६ व्या शतकात अरबमधून आलेले बाबा बुडन यांचे भक्त सर्व वर्गात आहे. जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा मुस्लिमांनी दर्गा बनवला तर हिंदूंनी पादुका बसवल्या. बाबा बुडनगिरी-दत्तात्रेयपीठ आणि भटकल यांचा मुद्दा इतका प्रभावी आहे की या तिन्ही जागांसह संपूर्ण कर्नाटक व दक्षिण भारतात त्याचा प्रभाव असतो. बाबा बुडनगिरीला कर्नाटकमधील दक्षिण अयोध्या म्हटले जाते. यासंदर्भात अजूनही सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे.

  उत्तर कन्नडमधून भाजपचे उमेदवार अनंतकुमार हेगडे पाच वेळा खासदार झाले. ते पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. धारवाडच्या ईदगाह मैदानावर तिरंगा फडकवल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोेतात आले. जेडीएसचे येथे अस्तित्व नाही. यंदा जेडीएसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे.
  उडुपी चिकमंगळूर कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९७८ मध्ये इंदिरा गांधी पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. येथून येदियुरप्पा टीमचे सक्रिय सदस्य शोभा करांडलंजे भाजपच्या उमेदवार आहेत. मागील वेळेस त्या येथूनच खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. जेडीएसकडून प्रमोद माधवराज यांना तिकीट मिळाले होते.

  दक्षिण कन्नड १९९१ पासून भाजपच्या ताब्यात आहे. संघाची फळी मजबूत आहे. भाजपचे नलिन कुमार सलग दोन वेळा येथून खासदार झाले आहेत. यंदा पुन्हा तेच निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिथुन राय यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

Trending