आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर हत्याकांडाशी लिंक; बीड आले पुन्हा तपास यंत्रणांच्या रडारवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- दहशतवादी कारवायामध्ये बीडच्या आरोपींचा संबंध दिसून आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा बीडवर लक्ष ठेऊन असतानाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी बीडची लिंक असल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र एटीएससह इतर तपास यंत्रणांच्या रडारवर बीड आले आहे. 


मुंबई बॉम्ब ब्लास्ट व २६/११ हल्ला प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला जबीउद्दीन अन्सारी हा बीडचा असल्याचे समोर आल्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा बीडवर लक्ष ठेऊन आहे. राज्यातही अनेक मोठ्या गुन्हेगारी कारवायांमध्ये बीडच्या गुन्हेगारी टोळ्यांचा अथवा त्यांच्या सदस्यांचा समावेश आढळून आलेला आहे किंवा त्यांना मोठ्या गुन्हेगारी कृत्यांना बीडमधून मदत मिळाल्याचेही अनेकदा समोर आलेले आहे. त्यातच आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाशी बीडचा संबंध समोर आला आहे. महाराष्ट्र एटीएसने दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात साकळी (जि. जळगाव) येथून अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी व लीलाधर ऊर्फ विजय लोधी यांनी एका दुचाकीची बीडमध्ये विल्हेवाट लावल्याची कबुली एटीएसला दिली आहे. ही दुचाकी दाभोलकर यांच्या हत्येवेळी वापरण्यात आल्याचा एटीएसला संशय आहे. त्यामुळे या दोघांना घेऊन एटीएस पथक बीडच्या त्या जागेची पाहणी करण्याचीही शक्यता आहे. कटरच्या साहाय्याने बीडमध्ये दुचाकीची विल्हेवाट लावण्यात आल्याचे दोघांनी तपास यंत्रणांना सांगितले आहे. 


बीडमध्ये मदत करणारे कोण? 
बीडमध्ये दुचाकीची विल्हेवाट लावण्यात आल्याची बाब खरी असेल तर त्यांना यासाठी बीडमध्ये कुणी मदत केली हा प्रश्न एटीएससमोर असेल. त्या अनुषंगाने एटीएस तपास करू शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...