आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lionel Messi Of Barcelona (Argentina) Completed His Half Century Of Goals In This For The Sixth Year In A Row

मेसीने सलग सहाव्या वर्षी 50 गोल करण्याचा रेकॉर्ड बनवला, मागील 10 कॅलेंडर ईअरमध्ये 9 वेळा असे केले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बार्सिलोनासाठी खेळताना मेसीने एल्वेसविरोधात 69 व्या मिनीटात गोल केला
  • लियोनल मेसीच्या गोलमुळे बार्सिलोनाने एल्वेसला 4-1 ने पराभूत केले

स्पोर्ट डेस्क- स्टार फुटबॉलर लियोनल मेसीने सलग सहाव्या वर्षी 50 गोल करण्याचा किर्तीमान रचला आहे. त्याने शनिवारी बार्सिलोनासाठी खेळताना एल्वेसविरोधातील सामन्यात हा कारनामा केला. मेसीने सामन्यात 69 व्या मिनीटात गोल मारुन आपला पन्नासावा गोल पूर्ण केला. बार्सिलोनाने एल्वेसवर 4-1 ने मात केली. बार्सिलोनाला लिगाच्या गुणतालिकेत 39 गुणांसोबत पहिले स्थान मिळाले आहे. मेसीशिवाय सामन्यात एंटोइने ग्रीजमॅन (14वा मिनीट), अर्तुरो विडाल (45वा मिनीट) आणि लुईस सुआरेज (75वा मिनीट) ने गोल केला.

मागील 10 कॅलेंडर ईअरमध्ये ही 9 वी वेळ आहे, जेव्हा मेसीने एका वर्षात 50+ गोल केले आहेत. याला अपवाद ठरले 2013 चे वर्ष, तेव्हा मेसीने 45 गोल केले होते. त्याने 2012 मध्ये 47 सामन्यात सर्वात जास्त 91 गोल गेले होते. मेसीने आतापर्यंत 443 सामन्यात 688 गोल केले आहेत.

मेसीला या महिन्यात सहाव्या वेळेस 'बॅलेन डी ऑर अवॉर्ड' मिळाला

मेसी यावर्षी चॅम्पियंस लीगमध्ये 34 वेगवेगळ्या संघाविरुद्ध गोल करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने बोरूसिया डॉर्टमंडविरुद्द गोल करुन हे यश मिळवले. मेसीपूर्वी पुर्तगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डो आणि स्पेनच्या राउलने 33 संघाविरुद्ध गोल केले होते. मेसीला यावर्षी बॅलेन डी ऑर अवॉर्ड देण्यात आला आहे. सहा वेळा हा अवॉर्ड जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...