आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी जिल्ह्यामध्ये १२ लाख रुपयांची दारू जप्त, निवडणूक काळातील दक्षता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी  - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल ११ लाख ७५ हजार ६४९ रुपयांची दारू जप्त करण्यात आली. 
जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात कठोरपणे अंमलबजावणीस सुरुवात केली होती. परभणी शहरासह ग्रामीण भागात ढाबे व हॉटेलवरून होणारी अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यात २०७ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने १०२ ठिकाणांवरून ७ हजार २३२ लिटर दारू जप्त केली. ७ लाख ११ हजार ७९७ रुपयांची दारू होती. पोलिस विभागाने १०० प्रकरणांत २ हजार १७४ लिटर दारू जप्त केली. विशेष पथकाने पाच प्रकरणांमध्ये १९८ लिटर दारू जप्त केली. त्याचबरोबर या कारवाईत १६ लाख ५५ हजार ६०१ रुपयांची रक्कमही जप्त केली.
 
 

बातम्या आणखी आहेत...