आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव परिसरात दारूच्या खाेक्यांचा ट्रक उलटला; तळीरामांची मात्र चंगळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - औरंगाबादहून आंध्र प्रदेशकडे विदेशी दारूचे खाेके घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला. ट्रक कलंडताच अनेक तळीरामांनी दारूचे खाेके लांबवले. मालेगाव ते वसमत रोडवर गिरिजा नदीलगत हा प्रकार घडला.

औरंगाबादहून आंध्रप्रदेशकडे दारूची वाहतूक करणारा ट्रक (२१ एक्स ५४११) मालेगाव ते वसमत रोडवर गिरिजा नदी परिसरात रस्त्याच्या कडेला कलंडला. लोकांनी यावेळी दारू व दारूचे बॉक्स लंपास केले. काही जणांनी तर जागेवरच दारूचा आस्वाद घेतला. सदर घटना पोलिस प्रशासनास कळताच याठिकाणी पोलिस कॉन्स्टेबल शेख मजाज, किशोर हुंडे, पोलिस मित्र सुनील एंगडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदरील लूट थांबली. या ट्रकमध्ये जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपयांची दारू असल्याचे कळते. या ट्रकमध्ये किंगफिशर या विदेशी मद्याचे दीड हजार बॉक्स होते.

बातम्या आणखी आहेत...