Home | Business | Insurance | list of govt schemes which are offering return more than bank fd

मिळेल FD पेक्षा जास्त व्याज, या चार-पाच ठिकाणी लावा पैसा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 12:41 PM IST

गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे की, डिपॉझिटवरील इंटरेस्ट रेट बँक सतत कमी करत आहे.

 • list of govt schemes which are offering return more than bank fd

  नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे की, डिपॉझिटवरील इंटरेस्ट रेट बँक सतत कमी करत आहे. यामुळे आता बँक FD वर मिळाणारे व्याज 7 टक्क्यांनी खाली घसरले आहे. महागाई कमी करण्यासाठी आरबीआयकडून ज्या प्रकारची कठीण मौद्रिक पध्दत वापरली जात आहे, त्यावरुन कळते की, येणा-या काळात बँक इंटरेस्ट रेट अजून कमी होतील. यामुळे आता बँक FD पेक्षा जास्त रिटर्न देणा-या फायनेंशियल प्रोडक्ट्सविषयी जाणून घेणे गरजेचे झाले आहे.

  येत्या काळात सरकारच्या अशा काही स्कीम आहेत, ज्या तुम्हाला चांगले रिटर्न देतील. तुम्ही या स्कीम्समध्ये पैसा लावून चांगले रिटर्न मिळवू शकता. ही स्किम सरकारची असल्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे गुंतवणूक करु शकता.

  नंबर-1: सुकन्या समृध्दी स्कीम
  रिटर्न : 8.1 टक्के

  तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने या स्किममध्ये गुंतवणूक करु शकता. स्किममध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला कमीत कमी 1,000 रुपये गुंतवणूक करु शकता. स्कीममध्ये एका वर्षात जास्तीत जास्त 1,50,000 रुपये गुंतवणूक केली जाऊ शकते. सुकन्या समृध्दी स्किमच्या माध्यमातून वर्षातून 8.1 टक्के रिटर्न मिळत आहे.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सरकारच्या स्किमविषयी...

 • list of govt schemes which are offering return more than bank fd

  नंबर-2: पोस्ट ऑफिस एफडी 
  रिटर्न : 7.4 टक्के


  पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्किम 5 वर्षांच्या कालावधीवर भेटते. स्किममध्ये तुम्ही कमीत कमी 200 रुपये गुंतवणूक करु शकता. स्किममध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही मर्यादा नाही. स्किमनुसार जास्तीत जास्त 7.4 टक्के वर्षांचे इंटरेस्ट भरता येऊ शकते. इंटरेस्टचे कॅल्क्यूलेशन तिमाही असते.


  पुढे वाचा, पब्लिक प्रॉविडेंट फंड स्किमवर किती रिटर्न मिळते...
   

 • list of govt schemes which are offering return more than bank fd

  नंबर-3: पब्लिक प्रॉविडेंट फंड (पीपीएफ)
  रिटर्न: 7.6 टक्के 


  पब्लिक प्रॉविडेंट फंड म्हणजेच पीपीएफवर 8.1 टक्के एका वर्षाचे रिटर्न मिळत आहे. तुम्ही 100 रुपये जमा करुन पीपीएफ अकाउंट ओपन करु शकता. अकाउंट अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी एका वर्षाचे 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे. पीपीएफमध्ये तुम्ही वर्षातून जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करु शकता. याचा कालावधी 15 वर्षांचा असतो. परंतू 7 वर्षानंतर तुम्ही आंशिक विड्रॉल करु शकता.


  पुढे वाचा- इंफ्रास्ट्रक्चर बांडवर किती रिटर्न 
   

 • list of govt schemes which are offering return more than bank fd

  नंबर-4: इंफ्रास्ट्रक्चर बांड 
  रिटर्न: 8.5 ते 8.9 टक्के 


  फिक्स्ड इनकम कॅटेगरीमध्ये इंफ्रास्ट्रक्चर बांड चांगला ऑप्शन आहे. इंफ्रास्ट्रक्चर बांड 10 ते 15 वर्षात मेच्योर होते. 10 वर्षांचा सरकारी बांड 8.5 टक्के ते 8.9 टक्के इंटरेस्ट देते. या बांडोंमध्ये 20,000 रुपये गुंतवणूक केल्यावर 80 सी नुसार मिळणा-या सुटपेक्षा जास्त सूट मिळते.

   

Trending