आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाकडे कोणती जबाबदारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील राजकीय नाट्यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. 28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरेंसह सहा मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र शपथविधी होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्याप पर्यंत खातेवाटप झाले नव्हते. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. सहा मंत्र्यांमध्येच खात्यांचे वाटप करण्यात आले आहे. खातेवाटपानुसार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शपथविधी झालेल्या प्रत्येकी दोन मंत्र्यांकडे विविध खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. 

  • एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह, नगरविकास, वन, पर्यावरण, पाणीपुरवठा जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे.
  • सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, उच्च तंत्रशिक्षण, कृषी, रोजगार हमी योजना, परिवहन खात्याची जबाबदारी असेल.
  • राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, उत्पादनात शुल्क, अन्न व औषध प्रशासन खाते देण्यात आले आहे.
  • त्याचप्रमाणे जयंत पाटील यांच्यावर वित्त, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार, अन्न नागरी पुरवठा आणि कामगार या खात्यांची जबाबदारी असेल.
  • महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जा, वैदकीय शिक्षण, शालेय शिक्षण आणि पदुम खाते आहे.
  • नितीन राऊत यांना सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून), आदिवासी महिला बालविकास, मदत व पुनर्वसन खाते देण्यात आले आहे.
  • याव्यतिरिक्त सर्व खाती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील.