आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका नव्हे या देशाकडे सर्वाधिक Nuclear Weapons, भारताकडे पाकपेक्षा कमीच..!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सर्वात बलाढ्य देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे जगावर प्रभुत्व आहे. अमेरिकेच्या एका निर्णयावर जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम घडून येतात. देश बनवण्यापासून एखादे राष्ट्र बेचिराख करण्याची ताकद अमेरिकेत आहे. परंतु, अमेरिका इतका बलवान असला तरीही अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया त्याला मात देऊ शकतो. रशियाकडे तब्बल 6800 अण्वस्त्र असल्याची अधिकृत नोंद आहे. अमेरिका तर सोडाच जगातील कुठलाही देश याची बरोबरी करू शकत नाही. रशियाचा सॅटन-1 आणि सॅटन-2 बॉम्बला अमेरिका सुद्धा घाबरतो. सोबतच अमेरिकेकडे मदर ऑफ ऑल बॉम्ब असेल तर रशियाकडे फादर ऑफ ऑल बॉम्ब आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिका आणि इस्रायलची सर्वात सुरक्षित अशी मिसाइलरोधी यंत्रणा थाड भेदणारे तंत्रज्ञान सुद्धा रशियन लष्कराने विकसित केले आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्र याची माहिती आम्ही देत आहोत.


रशिया
6800 अण्वस्त्र

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्सने डिसेंबर 2017 मध्ये विविध देशांच्या अण्वस्त्रांची आकडेवारी जारी केली. त्याच आकडेवारीनुसार, रशियाकडे 6800 न्यूक्लिअर वेपन्स असल्याचा अंदाज आहे. यापैकी 1710 अण्वस्त्रांना वेग-वेगळ्या ठिकाणी तैनात केले जाऊ शकते.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, भारतासह इतर देशांकडे असलेले न्यूक्लिअर मिसाइल्स...

बातम्या आणखी आहेत...