आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर.. सोनियांसह प्रियांका गांधी, राधकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांच्या सभांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यांसाठी  40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे या यादीत विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या दोघांचाही यादीत समावेश आहे.

 

दरम्यान, राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे चिरंजिव डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते नगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. यानंतर राधाकृ्‍ष्ण विखे पाटील यांनी कोणत्याही पक्षाचा प्रचार करायचा नाही, असे स्पष्ट केले होते. आता पक्षाने राधाकृष्‍ण पाटील यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादी केल्याने ते काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

कोण आहेत काँग्रेसचे स्टार प्रचारक?

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या या यादीत अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, डॉ. मनमोहन सिंह, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. तसेच कुमार केतकर, मोहम्मद अझरुद्दीन, नगमा मोराजी हे देखील महाराष्ट्रात पक्षाचा प्रचारात दिसणार आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जशीच्या तशी..