आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • List Of The 100 Most Influential Women In 100 Years, Who Created The World In A New Way And Showed New Ways

१०० वर्षांतील १०० सर्वात प्रभावशाली महिलांची यादी, ज्यांनी नव्या पद्धतीने जग घडवले अन् नवा मार्ग दाखवला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही येथे दहा महिलांचा (१९२० पासून प्रत्येक दशकातील) संक्षिप्त परिचय देत आहाेत.

टाइम मॅगझिनने गेल्या १०० वर्षांतील अशा १०० महिलांची सूची प्रसिद्ध केली आहे, ज्यांनी आपले विचार, परिस्थिती आणि व्यक्तिमत्त्वाच्या भरवशावर इतिहासात आपले विशेष स्थान बनवले आहे. यादीत  राजनेता, वैज्ञानिक, चित्रपट कलाकार आणि अशा व्यक्तित्वांचा सहभाग आहे ज्यांच्या वलयाने अनेक क्षेत्रांना चमकवले. यादीत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कपूरथळाच्या राजघराण्याच्या पूर्व राजकुमारी अमृत कौर यांनाही जागा मिळाली आहे. यादीेमुळे त्या चर्चेत आहेत. यामुळे आम्ही काही अन्य महिलांना समोर आणले.  आम्ही येथे दहा महिलांचा (१९२० पासून प्रत्येक दशकातील) संक्षिप्त परिचय देत आहाेत. 

१९२७ : सोराया तर्जी - प्रगतीपसंत महाराणी


निवड का : त्यांनी पडदा आणि बहुविवाह प्रथा नष्ट करण्यासाठी आणि महिलांच्या शिक्षणासाठी काम केले. 


उदार अफगाण बुद्धिजीवीची मुुलगी महाराणी सोराया तर्जींना परंपरांच्या शृंखला तोडणे आवडायचेे. महाराजा अमानउल्ला खानची पत्नी सोरायाची गणना १९२०च्या दशकातील मध्य पूर्वेची सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये होते. त्या प्रगतिशील विचारांसाठी ओळखल्या जात.  प्रखर विरोध असताना खान दांपत्याने बहुविवाह आणि पडदा प्रथेचा विरोध केला.  तर्जीने आपला पडदा जनतेसमोर फाडून टाकला होता. त्यांनी महिला अधिकारी आणि त्यांच्या शिक्षणासाठी काम केले.मुलींसाठी देशातील पहिली शाळा उघडली. १९३१ : मारिया मॉन्टेसरी - मॉन्टेसरीची जनक


निवड का : त्यांनी १०० वर्षे आधी मुलांच्या शिक्षणासाठी सोप्या आणि आवडीच्या प्रकारांची सुरुवात केली.


जगभरात चाललेल्या लाखो मॉन्टेसरी शाळांच्या घडामाेडींच्या मुळाशी १०० वर्षे आधी मारिया मॉन्टेसरीच्या आधुनिक शिक्षण तत्त्वज्ञान जुळलेले आहे. त्यांनी छोट्या मुलांना शिकवण्यासाठी पद्धती शोधल्या. ज्यामुळे मुलांना स्वतंत्रपणे विचार करण्याची संधी दिली. मुलांच्या अभ्यासाच्या जुन्या पद्धती निकालात काढल्या. मॉन्टेसरीने १९३१मध्ये शिक्षकांना आपल्या मॉन्टेसरी इंटरनॅशनल असोसिएशनमध्येे ट्रेनिंग दिले. त्या महात्मा गांधींच्या यजमान झाल्या.  त्यांनी भारतात मॉन्टेसरीच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.१९४५ : चिएन शिउंग वू - अणुबॉम्बची शिल्पकार


निवड का : अणुबॉम्बच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका राहिली. त्यामुळेे दुसरे महायुद्ध लवकर संपले. 


खूप कमी लोक जाणून आहेत की अमेरिकचे परमाणू हत्यार तयार करणारे मॅनहॅटन प्रोजेक्टशी भौतिकशास्त्रज्ञ चिएन शिउंग वू जुळलेल्या आहेत. त्यांच्याशिवाय प्रोजेक्ट अपयशी झाला असता.  १९१२मध्ये शांघायमध्ये जन्मलेल्या वू १९३६मध्ये अमेरिकेत आल्या. प्रिंस्टन युनिव्हर्सिटीत राहून वू अणुबॉम्बच्या संशोधनाशी जोडल्या गेल्या.मॅनहॅट्न प्रोजेक्टअंतर्गत त्यांनी बॉम्बच्या इंधनाला वेगळे करण्यासाठी मदत केली. १९४५मध्ये जेव्हा अणुबॉम्बचा उपयोग केला तेव्हा फर्मी आणि ओपेनहिमरचे नाव समोर आलेे. १९५४ : मर्लिन मनराे - ग्लॅमरस आयकॉन


निवड का : त्यांनी एका अशा सिस्टिममध्ये आपली जागा बनवली जे सुरुवातीपासून त्यांच्या विरोधात सक्रिय होते. 
हॉलीवूड चित्रपट स्टार मर्लिन मनराेची एक छवी अनेक पिढ्यांपर्यंत लोकांच्या हृदयात होती. त्या १९५४मध्ये न्यूयॉर्क शहराच्या लेक्सिंगटन एवेन्यू आणि ५२व्या रस्त्यावर द सेव्हन इयर इच चित्रपटासाठी पोज देत होत्या.सबवेकडून येणाऱ्या वेगवान हवेने त्यांनी घातलेल्या पांढऱ्या ड्रेसने  त्यांच्या शरीराला इकडे-तिकडे उडवले. ही प्रतिमा एक आनंददायी स्मृती म्हणून लोकांच्या मनात ठासून राहिली. मनरोचे व्यक्तित्व चर्चेत राहिले. पुरुषवर्ग त्यांना केवळ इच्छा पूर्ण करणारी वस्तू म्हणून पाहायचा. १९६२ : जॅकलिन केनेडी - नव्या अमेरिकेची ओळख


निवड का : त्या आपल्या जमान्याच्या फॅशन आयकॉन होत्या. कठीण परिस्थितीत जीवनाचे नवे सौंदर्य त्यांनी रचले.
एलिट लाइफ स्टाइलसाठी जॅकलिनवर टीका व्हायची. जॉन एफ केनेडी अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी व्हाइट हाउसला नवे रूप दिले. जॅकलीन लवकरच फॅशन आयकॉन बनली. त्यांनी अमेरिकी लोकांमध्ये इतिहास आणि कलेला प्राथमिकता देण्याचे अभियान छेडले. ट्रेंड तयार करणाऱ्या स्टाइलने त्यांना लोकप्रियता दिली. राष्ट्रपती केनेडीने स्वत:ला अशी व्यक्ती म्हटले होते, जाे जॅकलीन केनेडीबरोबर पॅरीस आला आहे. केनेडीच्या हत्येनंतर आपल्या व मुलांच्या  सुरक्षेसाठी त्यांनी ओनासिसशी विवाह केला. १९७९ : तू यूयू - मलेरियावर उपचार


का निवडले: जीवघेण्या मलेरियाच्या उपचारावर प्रभावी औषधाचा शोध लावला. नोबेल पुरस्कारही मिळाला.
तू यूयू यांनी संसर्गजन्य रोगावर पहिला विजय पौगंडावस्थेत प्राप्त केला. त्या वेळी त्यांनी टीबीला मागे टाकले होते. या अनुभवाने त्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर बनवण्यास प्रेरणा मिळाली. मलेरियामुळे कोट्यवधी मृत्यूपासून बचाव करणारे आर्टेमिसिनीन औषध शोधल्याबद्दल त्यांची इतिहासात आठवण काढली जाईल.आर्टेमिसिनीन वनस्पतीपासून काढला जातो. हे पारंपरिक चिनी औषधोपचारात वापरले जाते. १९८७ : डायना - जनतेची राजकुमारी


का निवडले : त्यांनी मानवतेचा संदेश दिला. रुग्णालयात जाऊन त्यांनी रुग्णांना आधार दिला.
ब्रिटनचे राजकुमार चार्ल्सशी विवाह झालेल्या प्रिन्सेस डायना ऑफ वेल्स त्यांच्या सुंदर व्यक्तिमत्त्व, राजघराण्याची परंपरा मोडण्यासाठी प्रसिद्ध होत्या. चार्ल्सशी वैवाहिक संबंध निर्माण झाल्याने फॅशन डिझायनर्स, बॅले डान्सर्स, आर्ट डीलर्स आणि रॉयल पॅलेसमधील कर्मचारी यांच्यात त्यांचे वैयक्तिक जग मर्यादित होते. त्या वेळी अनेक अंधश्रद्धा एड्सच्या असाध्य आजाराशी संबंधित होत्या.१९९८ : जे. के. रॉलिंग - जादुई लेखणी


का निवडले: त्याच्या हॅरी पॉटर मालिकेने मुले, तरुणांना पुस्तकांशी जोडले. प्रकाशन उद्योग बदलला.


रॉलिंगच्या हॅरी पॉटर कादंबरीच्या मालिकेमुळे प्रकाशन जगतात अनेक विक्रम नोंदवले. बाल जादूगार हॅरी पॉटरने लवकरच ब्रिटन सोडले आणि जगभरात लोकप्रिय झाला. १९९८ मध्ये, हॅरी पॉटर आणि चेंबर ऑफ सिक्रेट्स हे ब्रिटनमधील बेस्टसेलरच्या यादीत प्रथम क्रमांकाचे मुलांचे पुस्तक होते. लवकरच वॉर्नर ब्रदर्सने हॅरी पॉटरवर चित्रपटाचे हक्क विकत घेतले. हॅरीने बुक स्टोअर आणि थिएटरमध्ये कोट्यवधींची कमाई केली.२००३ : सेरेना विल्यम्स - विजेतेपदाची जिद्द


का निवडले : त्यांनी अश्वेत पिढीला नवीन प्रेरणा दिली. टेनिसमधील गोऱ्या महिलांचे वर्चस्व मोडीत काढले.
२००३ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर सेरेना विल्यम्स ही चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी टेनिस इतिहासातील पाचवी महिला ठरली. टेनिस जगतात २० वर्षे घालवलेल्या आणि २३ प्रमुख पदके जिंकणाऱ्या सेरेनाने एक नवा संदेश दिला आहे. टीकाकार त्यांच्यावर वर्णद्वेषी भाष्य करतात. तिच्या मजबूत शारीरिक यष्ठीची खिल्ली उडवली जाते. २०१७ मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला.  २०१० : नॅन्सी पेलोसी - दिग्गजांशी लढत


का निवडल : त्यांनी राष्ट्रपतींची मनमानी रोखण्यासाठी पुढाकार घेतला. अमेरिकन प्रणालीत संतुलन ठेवले.
अमेरिकी संसदेचे सदस्य आणि संसदेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोर्चा काढल्याबद्दल त्यांची आठवण डेमोक्रॅटिक पार्टीला नेहमीच राहील. राष्ट्रध्यक्षांविरुद्ध महाभियोग चालवताना मुख्य सूत्रधार म्हणून भूमिका बजावली. नॅन्सीने संकटात कठोर निर्णय घेतलेत. २०१०मध्ये पेलोसी यांनी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना आरोग्य विमा योजना राबवण्यास प्रेरित केलेे. पॅलोसी यांनी महिलांच्या वेतनातील तफावत संपवली.

या महिलांनीही आपली वेगळी छाप साेडली

गोल्डा मायर


१०० महिलांच्या सूचीमध्ये काही अशी नावे अाहेत,त्यांची अाठवण ठेवण्याची अनेक कारणे आहेत. इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय, इस्रायलची पहिली महिला पंतप्रधान गोल्डा मायर, ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर आणि फिलिपाइन्सच्या कोराझॉन एक्विनाे यांनी त्यांच्या देशात एक नवीन प्रवाह सुरू केला.
 


> काही महिलांचे योगदान त्यांच्या नावांपेक्षा अधिक ओळखले जाते. मानवी डीएनएची रचना ओळखण्यासाठी केमिस्ट रोझलिंड फ्रँकलिन यांनी एक उल्लेखनीय काम केले. तथापि, हे नाव त्यांच्या पुरुष सहकाऱ्याचे झाले हाेतेे. एड्स विषाणूचा शोध लावणारे गणितज्ञ आणि संगणक मास्टर ग्रेस हॉपर, फ्रांस्वा बारे सिनोसी अशा सेलिब्रिटी आहेत.
 
> संगीत, अभिनयासह ललित कला क्षेत्रात अनेक कथा आहेत. अमेरिकेच्या बेसी स्मिथने गायनात एक नवी ओळख निर्माण केली. १९२३ मध्ये त्यांच्या डाउनहार्टेड ब्लूजच्या गाण्यांच्या अाठ लाख प्रती एका वर्षात विकल्या गेल्या. मार्था ग्राहम यांना १९९८ साली डान्सर ऑफ द सेंच्युरी पदवी मिळाली. मॅडोना आणि बेयाेंस यांची वेगळी ओळख आहे.
 
> बऱ्याच स्त्रियांनी आपल्या देशात नैतिक नेतृत्व दिले. केनियाचे पर्यावरण कार्यकर्ते वंगारी मथाई यांना २००१ मध्ये वृक्षारोपण केल्याबद्दल तुरुंगात टाकले गेले. कम्युनिस्ट पोलंडमध्ये अण्णा वालेंटिनोविस्ज यांनी तिच्या शिपयार्डमधील कामगारांना संघटित केले. मलाला युसूफ व स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग यांनी एक नवीन विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.