चिमुकलीच्या तोंडात मिठाई / चिमुकलीच्या तोंडात मिठाई म्हणत ठेवला सुतळी बॉम्ब; स्फोट होताच जमीनीवर कोसळली, झाले असे हाल...

दिव्य मराठी वेब टीम

Nov 09,2018 03:11:00 PM IST

लखनौ - भारतासह जगभरात दिवाळी साजरी होत असताना एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशात एका अवघ्या 3 वर्षांच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि आग लावली. चिमुकली इतकी गंभीर जखमी झाली की तिचे दोन्ही गाल फाटले. पीडितेच्या मुलीने सांगितल्याप्रमाणे, गावातच राहणारा एक युवक त्या मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि तिच्यासोबत असे कृत्य केले. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.


गालांवर लागले 50 टाके...
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना 3 वर्षांची मुलगी आयुषी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणारा एक युवक तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. हात बंद करून त्याने मुलीच्या तोंडाजवळ नेले. तिला ती मिठाई असल्याचा गैरसमज झाला. परंतु, ते प्रत्यक्षात एक सुतळी बॉम्ब होते. एवढेच नव्हे, तर आरोपीने तो बॉम्ब तिच्या तोंडात ठेवून आग लावली. अवघ्या काही सेकंदात बॉम्ब फुटला आणि तिच्या तोंडाच्या चिंधळ्या उडाल्या. गंभीर जखमी अवस्थेत मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तिच्या गालांवर तब्बल 50 टाके लावले आहेत. संक्रमण तिच्या गळ्यापर्यंत पोहोचले असून तिची प्रकृती अजुनही चिंताजनक आहे.

X
COMMENT