आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षांची चिमुरडी आईला म्हणाली मी स्वतःचा द्वेष करते, कारण ऐकूण हादरली, वडिलांनी असे काही केले की होत आहे कौतुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्टल - अमेरिकेत राहणारी एक महिला एकदिवस मुलीबरोबर बोलत होती. त्याचवेळी मुलगी तिला म्हणाली की, ती स्वतःवर प्रेमच करत नाही. कारण विचारले तेव्हा ती मुलगी म्हणाली कारण तिच्या डोक्यावर जराही केस नाहीत. एका विचित्र आजारामुळे या मुलीच्या डोक्यावरील संपूर्ण केस गळाले आहेत. त्यामुळे ती स्वतःचा द्वेष करत असल्याचे म्हणत होती. त्यानंतर मुलीला आनंद व्हावा यासाठी तिच्या वडिलांनी असे काही केले की, ज्याची अपेक्षा तिच्या वडिलांनाही नव्हती.


आईला बसला धक्का 
ही कथा आहे अमेरिकेच्या ब्रिस्टल शहरातील डेव्ह सिल्वेरिया (41), त्याची पत्नी चेल्सिया (33) आणि त्यांची 6 वर्षांची मुलगी रिले यांची. रिलेला एलोपेसिया नावाचा दुर्मिळ आजार आहेत. त्यामुळे तिच्या शरिरारातील रोग प्रतिकारक क्षमता कमी होते आणि संपूर्ण केस गळतात. एक दिवस चेल्सिया मुलीशी बोलत होती. त्यावेळी ती मुलीला म्हणाली मी तुझ्यावर खूप प्रेम करते. त्यावर रिलेने तिला विचारले तू स्वतःवर प्रेम करतेस का. आईने रिलेला हो असे उत्तर दिले. सर्वांनी स्वतःवर प्रेम करावे असे आई रिलेला म्हणाली. आईने रिलेला विचारले तू स्वतःवर प्रेम करतेस का? त्यावर रिले हळूच नाही म्हणाली, आईने तिला कारण विचारले तर ती म्हणाली, माझ्या डोक्यावर केस नाहीत, म्हणून मी स्वतःवर प्रेम करत नाही. मुलीच्या उत्तराने चेल्सियाला धक्का बसला. तिने लगेच पतीला फोन केला आणि सर्वकाही सांगितले. 


मुलीसाठी काढले केस 
मुलीशी बोलताना डेव्ह तिला म्हणाला, तू फार खास आहेस. तू असा विचार करायला नको. मी तुझ्यावर अशी असली तरू खूप प्रेम करतो. केस असणे काहीही म्हत्त्वाचे नाही. त्यानंतर मुलीला सरप्राइज करत डेव्ह तिला म्हणतो, तुला मलाही तुझ्यासारख्या लूकमध्ये पाहायचे आहे का? त्यावर रिले हसते. डेव्हने लगेचच त्याच्या डोक्याचे केस शेव करत पूर्ण केस काढले. मुलीला वाईट वाटू नये आणि केस फार महत्त्वाचे नसतात असे मुलीला वाटावे म्हणून, डेव्हने असे सर्व केले. डेव्हचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड हिट झाला. 

बातम्या आणखी आहेत...