आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्याशा गोष्टीवर Live In पार्टनरवर आला इतका राग, विटांनी ठेचून केला खून; पळून जात असताना भीषण अपघातात आरोपीचाही मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम - हरियाणातील गुरुग्राम येथे हत्येचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एक कपल गेल्या काही दिवसांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यातील तरुणीची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्येचा आरोपी तिचा पार्टनरच होता. परंतु, घटनास्थळावरून काही अंतरावर त्याच्या कारमध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे. तो खून करून पळून जात होता त्याचवेळी त्याचा देखील मृत्यू झाला असा अंदाज लावला जात आहे. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2018 मध्ये शहरातील सेक्टर-40 मध्ये एका घरात रोहित आणि गौरी उर्फ सीमा लिव्ह इनमध्ये राहत होते. रोहित पॉलिसी बाजारमध्ये काम करतो. तर गौरी एक विधवा होती. पतीच्या निधनानंतरच ती रोहितसोबत राहायला लागली होती. शेजाऱ्यांना देखील ते लिव्ह इनमध्ये राहत असल्याची माहिती नव्हती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशीरा गौरी आणि रोहितमध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वाद इतका वाढला की रोहितने रागाच्या भरात एक वीट तिच्या डोक्यात घातली आणि ती जागीच कोसळली.


पळून जात असताना रोहितचाही मृत्यू
गौरीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून रोहित प्रचंड घाबरला आणि तेथून निघून गेला. रोहित पळून जात असताना त्याच्या शेजाऱ्यांनी पाहिले. अपार्टमेंटमध्ये पाहिले तेव्हा गौरी रक्तरंजित अवस्थेत पडली होती. मदत पोहोचण्यापूर्वीच गौरीचा अतीरक्तस्रावाने मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले. रोहित जेव्हा पळून जात होता, त्याचवेळी त्याच्या कारचा अपघात घडला आणि गाडीला आग लागली. या आगीत 70 टक्के होरपळलेल्या रोहितचा देखील मृत्यू झाला. दरम्यान, रोहितच्या कुटुंबियांना रुग्णालयात बोलावून पोस्टमॉर्टम करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...