आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्ह इन रिलेशन : प्रेयसीने वादानंतर पळवली प्रियकराची कार 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : अयोध्यानगरातील विवाहित तरुण व महाबळ येथील तरुणी एकमेकांसोबत 'लिव्ह इन रिलेशनशीप'मध्ये राहत होते. दोघांमध्ये वाद झाल्यामुळे या प्रियसीने एका मित्राच्या मदतीने प्रियकराची घरासमोर उभी केलेली ५ लाख ४० हजार रुपये किमतीची कार थेट क्रेनच्या मदतीने ओढून नेत पळवली. या प्रकरणी रविवारी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.    कार पळवल्याप्रकरणी श्रीकृष्ण तुकाराम मेंगडे (वय ३७, रा. अयोध्यानगर) यांनी पाेलिसात फिर्याद दिली आहे. मेंगडे यांचा केळी खेरदी-विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादीनुसार सन २०१६पासून त्यांचे मनीषा व्यंकटेश त्रिपाठी (रा. महाबळ) यांच्याशी प्रेमसंबध होते. दोघे विवाहीत असून 'लिव्ह इन रिलेशनशीप'मध्ये राहत होते. दोघांच्या परिवाराची तक्रार नव्हती.    दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वाद झाले. यामुळे त्यांचे प्रेमसंबध संपुष्ठात आले होते. त्यानंतर २६ जुलै २०१९ रोजी मेंगड हे कामानिमित्त यावल तालुक्यात गेले होते. त्यामुळे त्यांची कार (क्रमांक एमएच-१९, सीडी-४२२२) घरासमोर उभी होती. या वेळी मनीषा त्रिपाठी व अातीश राणा (पूर्ण नाव माहिती नाही, रा. रथ चौक) हे दोघे मेंगडे यांच्या घरी आले. त्यांनी जबरदस्तीने कारचा दरवाजा तोडून कार सुरू करण्याचा प्रयत्न केला; पण कार सुरू न झाल्यामुळे काही वेळातच क्रेन (क्रमांक एमएच-१९, सीवाय-१११८) बोलावून त्याच्या मदतीने कार ओढून नेली. या वेळी मेंगडे यांच्या पत्नीने त्यांना विरोध केला; परंतु, त्यांनी विरोध झुगारुन कार ओढून नेली. मेंगडे यांनी घरी आल्यानंतर मनीषा, राणा यांना फोन करुन कार परत मागितली; पण दोघांनी कार देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी याच दिवशी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानुसार रविवारी गुन्हा दाखल करण्यात अाला.  अयाेध्यानगरात तुकाराम मेंगडे यांची कार क्रेन लावून वाहनातून अशी पळवून नेली.    चावी हरवल्याचे सांगून क्रेन बुक करून कार पळवली  अयाेध्यानगरातून चारचाकी ओढून नेण्यासाठी मनीषा यांनी स्वत:च्या कारची चावी हरवल्याचे क्रेन सर्व्हिस यांना सांगितले होते. त्यानुसार महाबळ येथील एका क्रेन सर्व्हिसने त्यांची मदत केली. मनीषा व राणा हे दोघे कार ओढून नेत असल्याचे फोटो मेंगडे यांच्या पत्नीने मोबाइलमध्ये काढले आहेत. दरम्यान, या घटनेने अयाेध्यानगर परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी याच दिवशी पाेलिस ठाण्यात अाॅनलाइन तक्रारही दाखल झालेली हाेती.