आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ind vs Aus : शेवटच्या ओव्हरमध्ये भारताने गमावला पहिला T20 सामना, धवनची खेळी व्यर्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा 4 धावांनी पराभव झाला आहे. 

 

तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने नाणेफेक करत गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. खलील अहमदने पाचव्या ओव्हरमध्ये शॉर्टला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कुलदीपने दोन विकेट्स घेतल्या. पण नंतर आलेल्या मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजी केली. पावसामुळे 17 व्या ओव्हरमध्ये सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. त्यानंतर एकच ओव्हर पूर्ण होऊ शकली आणि सामना 17 ओव्हर्सचा असल्याचे जाहीर झाले. पावसाच्या व्यत्ययामुळे 3 ओव्हर्स कमी केल्याने सामना फक्त 17 ओव्हर्सचाच असणार आहे. 

 

भारताच्या रोहित आणि शिखर यांनी चांगली सुरुवात केली. धवनने पहिल्याच ओव्हरपासून फटकेबाजी सुरू केली. त्याने 28 चेंडूत अर्धशतक केले. रोहितला मात्र सूर गवसला नाही. त्यामुळे पाचव्या ओव्हरमध्ये तो अवघ्या 7 धावांवर बाद झाला. शिखर धवनने मात्र 76 धावांची खेळी केली. त्यानंतर रिषभ पंत आणि कार्तिकने भारताला विजयाच्या दिशेने मार्ग दाखवला. पण विजयी कामगिरी मात्र त्यांना पूर्ण करता आली नाही.  

 

 

स्कोअरकार्ड - सेकंड इनिंग - इंडिया

> रोहित शर्मा आणि शिखर धवनने केली भारताच्या इनिंगची सुरुवात

> धवनने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन चौकार खेचत इरादे स्पष्ट केले. 

> शिखर धवनने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. रोहितला सूर गवसला नाही. 

> पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बेहरेंड्रॉफने रोहितला बाद केले. त्याने फक्त 7 धावा केल्या. 

> स्कोअर - 5 ओव्हर्सनंतर भारत 1 बाद 41 (धवन 32, राहुल 1)

> धवनने जोरदार फटकेबाजी करत 28 चेंडूंमध्ये अर्धशतकी कामगिरी केली. 

> भारताच्या दृष्टीने सर्वकाही सुरळीत सुरू असताना एल राहुल बाद झाला. 

> नवव्या ओव्हरमध्ये झंपाने राहुलला 13 धावांवर बाद केले. 

> स्कोअर - 10 ओव्हर्सनंतर भारत 2 बाद 93 (धवन 65, कोहली 4)

> कोहलीही फार काळ मैदानावर टिकला नाही. 

> राहुलला बाद करणाऱ्या झंपानेच विराट कोहलीलाही तंबूत परत धाडले. त्याने फक्त 4 धावा केल्या. 

> पुढच्याच ओव्हरमध्ये शिखर धवनही बाद झाला. त्याने 76 धावा केल्या 

> त्यानंतर कार्तिक आणि पंत यांनीदेखिल चांगली फलंदाजी केली. 

> स्कोअर - 15 ओव्हर्सनंतर भारत 4 बाद 149 (कार्तिक 21, पंत 20)

> कार्तिक आणि पंत विजयी कामगिरी करूनच परतणार असे वाटले असतानाच पंत बाद झाला. 

> रिषभ पंतने 20 धावा केल्या. 

> शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी भारताला 13 धावांची गरज. 

> कृणाल पांड्या अवघ्या 2 धावांवर बाद, सर्व मदार कार्तिकवर 

> कृणाल पाठोपाठ कार्तिकही बाद झाला आणि भारताने सामना गमावला

 

 

स्कोअरकार्ड - फर्स्ट इनिंग - ऑस्ट्रेलिया 
> नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 
> पाचव्या ओव्हरमध्ये खलील अहमदने शॉर्टला बाद केले. कुलदीपने झेल गेतला. 
> स्कोअर - 5 ओव्हर्सनंतर - ऑस्ट्रेलिया 1 बाद 31 (फिंच 19, लिन 5) 
> फिंच आणि लिनने काही काळ फटेबाजी केली. 
> नवव्या ओव्हरमध्ये भारताला दुसरे यश मिळाले. 
> अॅरॉन फिंचला कुलदीप यादवने बाद केले. त्याने 27 धावा केल्या. 
> स्कोअर - 10 ओव्हर्सनंतर - ऑस्ट्रेलिया 2 बाद 75 (लिन 37, मॅक्सवेल 4) 
> 11 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर कुलदीपला आणखी एक यश मिळाले
> कुलदीपने फटकेबाजी करणाऱ्या लिनना 37 धावांवर बाद केले. 
> लिन बाद झाल्यानंतर आलेल्या मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी 
> मॅक्सवेलने पांड्या ओव्हरमध्ये सलग 3 षटकार खेचले. 
> स्कोअर - 15 ओव्हर्सनंतर - ऑस्ट्रेलिया 3 बाद 135 (मॅक्सवेल 38, स्टॉयनिस 21)

> पाऊस आल्याने 17 व्या ओव्हरमध्ये सामना काही वेळासाठी थांबवण्यात आला. 

> पावसानंतर खेळ सुरू होताच पहिल्याच चेंडूवर बुमराहने मॅक्सवेलला बाद केले त्याने 46 धावा केल्या. 

> 17 ओव्हर्सच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने 4 बाद 158 धावा केल्या. 

> डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताला विजयासाठी 17 ओव्हर्समध्ये 174 धावांची गरज. 
 

 

बातम्या आणखी आहेत...