Home | National | Delhi | Live rafale negotiations defence ministry protested against pmo undermining Says Rahul Gandhi

राहुल गांधींचा घणाघात: 'रफाल'मध्ये थेट मोदींचा हात, अंबानींना दिले 30 हजार कोटी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 08, 2019, 11:42 AM IST

वढेरा, चिदंबरम कुणाचीही चौकशी करा, पण रफालवर उत्तर द्या, राहुल गांधींची आणखी एक पत्रकार परिषद

  • Live rafale negotiations defence ministry protested against pmo undermining Says Rahul Gandhi

    नवी दिल्ली - राफेल डीलवरून देशात सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव नाही. इंग्रजी दैनिक 'द हिंदू'ने खुलासा केला आहे की, फ्रान्स सरकारसोबत राफेलसाठी संरक्षण मंत्रालयाकडून सुरू असलेल्या डीलदरम्यान पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या हस्तक्षेपाचा फायदा फ्रान्सला मिळाला होता. पीएमओच्या हस्तक्षेपाला संरक्षण मंत्रालयाने विरोधही केला होता. आता याच मीडिया रिपोर्टच्या आधारे काँग्रेसने पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या डीलमध्ये थेट हस्तक्षेप केला होता.

    रफाल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष सहभागी आहेत. आम्ही संयुक्त चौकशी समितीची मागणी करत आहेात. अनिल अंबानींना 30 हजार कोटी दिल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

    राहुल म्हणाले की, या वादग्रस्त राफेल डीलवर दोन्ही देशांकडून उच्च पातळीवर होत असलेल्या चर्चेत पीएमओच्या 'समांतर चर्चे'ला भारतीय संरक्षण मंत्रालयाने प्रखर विरोध केला होता. पीएमओच्या 'समांतर हस्तक्षेपा'मुळे संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची टीम व्यवहाराच्या चर्चेत कमजोर पडली. 24 नोव्हेंबर 2015 रोजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी याची दखल घेतली.

    काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेल डीलवर नव्या खुलाशानंतर पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला केला आणि इंग्रजी दैनिकाचा हवाला देत म्हटले की, संरक्षण मंत्रालयाने या सौद्याचा विरोध केला होता.


Trending