आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिडनी - सिडनी कसोटीत भारतीय संघ भक्कम स्थितीत पोहोचला आहे. भारताने पहिल्या डावात 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या दिवशी शतक झळकावलेल्या पुजाराने दुसऱ्या दिवशीही उत्तम खेळी केली. पण त्याचे द्विशतक अवघ्या 7 धावांनी हुकले आणि तो 193 धावांवर बाद झाला. तर ऋषभ पंतनेही उत्कृष्ट अशी शतकी खेळी केली. रवींद्र जडेजानेही 81 धावांची खेळी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येत मोलाची भर घातली. हनुमा विहारीने 42 धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया बिनबाद 24..
दरम्यान, भारताने 622 धावांचा डोंगर उभारल्यानंतर दिवसातील अखेरच्या काही षटकांसाठी ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी बोलावले. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 24 धावा केल्या. म्हणजे ते अजूनही पहिल्या डावात भारतापेक्षा 598 धावांनी पिछाडीवर आहे. ऋषभ पंतने एक झेल सोडल्याने या दरम्यान भारताने एक चांगली संधी गमावली.
पुजाराचा ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च स्कोर
पुजाराचा हा ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च स्कोअर आहे. त्यापूर्वी पुजाराची ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च धावसंख्या 123 होती. त्याने अॅडिलेडमध्ये ही खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलियाविरोधात त्याने तिसऱ्यांदा 150 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने मार्च 2013 मध्ये हैदराबादेत 204 तर मार्च 2017 मध्ये 202 धावांची खेळी केली.
पुजाराने केली द्रविडची बरोबरी
पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियात 150 हून जास्त धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी फक्त राहुल द्रविडलाच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियात 150+ धावांचा टप्पा ओलांडता आला होता. द्रविडने 2003 मध्ये अॅडिलेट कसोटीत 233 धावांची खेळी केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.