बॅग घेऊन सहजपणे / बॅग घेऊन सहजपणे बोलत होता तरुण, रेल्वे येताच मारली उडी, कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले LIVE सुसाइड

दिव्य मराठी वेब टीम

Aug 17,2018 12:05:00 PM IST
वांकानेर - येथील रेल्वे फाटकावर एका तरुणाने रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केली. सोशल मीडियावर या घटनेचा एख व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण बॅग घेऊन अगदी आरामात एका दुचाकीस्वाराशी चर्चा करताना दिसत आहे. काही वेळातच रेल्वेचा आवाज आला. तेवढ्यात युवकाने रेल्वे पटरीकडे धाव घेतली आणि जाऊन पटरीवर झोपला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण नवसारीचा रहिवासी होता. कोणीतरी आत्महत्येचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिस प्रकरणांची चौकशी करत आहेत.

X
COMMENT