आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करुणानिधी अनंतात विलीन, स्मारकावर लिहिले- \'आयुष्यभर विश्रांती न घेतलेला नेता अाता आराम करताेय\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे अध्यक्ष एम.करुणानिधींवर बुधवारी संध्याकाळी राजकीय इतमामात मरिना बीचवर त्यांचे गुरू अाणि माजी मुख्यमंत्री सी.एन.अण्णादुराई यांच्या स्मारकाजवळ दफनविधी करण्यात अाले. दरम्यान, मरिना बीचवर अण्णाद्रमुकचे संस्थापक एम.जी.रामचंद्रन व माजी मु‌ख्यमंत्री जयललिता यांचेही स्मारक अाहे.


तत्पूर्वी मंगळवारी करुणानिधींच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने त्यांच्या दफनविधीसाठी मरिना बीचवर जागा देण्यास नकार दिला हाेता. त्यासाठी द्रमुकने रात्रीच मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. या मुद्द्यावर रात्री ११ ते सव्वाएक वाजेपर्यंत सुनावणी सुरू हाेती व निर्णय बुधवारपर्यंत टाळण्यात अाला हाेता. त्यानंतर न्यायालयाने बुधवारी सकाळी ९ वाजता सरकारचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत करुणानिधींवर मरिना बीचवरच दफनविधी करण्याचा निर्णय दिला.

 

 

कुटुंबियांनी घेतले शेवटचे अंत्‍यदर्शन

 

M #Karunanidhi's family pays last tribute to the DMK chief at Marina beach. Burial to take place shortly pic.twitter.com/hNIW5dkjOy

— ANI (@ANI) August 8, 2018

कधीही खासदार न बनलेल्या नेत्यासाठी प्रथमच संसद स्थगित
असे पहिल्यांदाच झाले अाहे की, संसदेच्या दाेन्ही सभागृहांचे कामकाज कधीही खासदार न बनलेल्या नेत्यासाठी स्थगित केले गेले. याच कारणामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी खासदारांचे मत मागितले असता, सर्व खासदारांनी स्थगितीला हाेकार दिला. त्यानुसार दाेन्ही सभागृहांत माैन पाळण्यात येऊन करुणानिधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन नंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले.

 

पंतप्रधान माेदींसह अनेकांची श्रद्धांजली 
करुणानिधींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राजाजी हाॅलमध्ये ठेवण्यात अाले हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले आणि करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन व कन्या कनिमाेझी यांचे सांत्वन केले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, साेनिया गांधी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अखिलेश यादव यांनीही अंत्यदर्शन घेतले. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत व कमल हसन यांनीही करुणानिधींना श्रद्धांजली अर्पण केली.

 

#WATCH: PM Narendra Modi talks to DMK leaders MK Stalin & Kanimozhi, after paying last respects to M #Karunanidhi at #RajajiHall in Chennai. pic.twitter.com/cEiwjEdNbz

— ANI (@ANI) August 8, 2018

हाॅलबाहेर गाेंधळ; दाेघांचा मृत्यू
करुणानिधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांचे हजाराे समर्थक राजाजी हाॅलबाहेर जमले हाेते. कुठल्याही परिस्थितीत अापल्या नेत्याचे अंत्यदर्शन व्हावे म्हणून हे समर्थक धडपडत हाेते. त्यामुळे त्यांनी धक्काबुक्कीस सुरुवात केल्याने हाॅलबाहेर गाेंधळ माजला. त्यात दाेन जणांचा मृत्यू झाला, तर ३० पेक्षा अधिक समर्थक जखमी झाले. करुणानिधींचे पुत्र एम.स्टॅलिन यांनी राज्यातील सर्व नागरिकांना शांतता पाळण्याचे अावाहन केले.

In Chennai, I paid tributes to an extraordinary leader and a veteran administrator whose life was devoted to public welfare and social justice.

Kalaignar Karunanidhi will live on in the hearts and minds of the millions of people whose lives were transformed by him. pic.twitter.com/torAPw1gUe

— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2018

राहुल गांधी म्हणाले सरकारने उदार व्हावे 
राहुल गांधी म्हणाले, जयललितांप्रमाणे करुणानिधीदेखिल तमिळ लोकांचा आवाज होते. त्यामुळे त्यांना मरीना बीचवर जागा दिली जावी. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, तमिळनाडू सरकारने अशावेळी राजकारण करायला नको. 

 

Like Jayalalitha ji, Kalaignar was an expression of the voice of the Tamil people. That voice deserves to be given space on Marina Beach. I am sure the current leaders of Tamil Nadu will be magnanimous in this time of grief. #Marina4Kalaignar

— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 7, 2018

 

 

बातम्या आणखी आहेत...