• Home
  • National
  • Live Updates of voting for Assembly Election 2018 in Rajasthan and Telangana

विधानसभेचे रण : / विधानसभेचे रण : राजस्थानमध्ये 5 वाजेपर्यंत 72% तर तेलंगणात 3 वाजेपर्यंत 56% मतदान

वसुंधरा राजे झालरापाटन, सचिन पायलट टोंक आणि अशोक गेहलोत सरदारपुरामधून निवडणूक लढवत आहेत. 

 

Dec 07,2018 05:59:00 PM IST

जयपूर/हैदराबाद - राजस्थान आणि तेलंगणा विधानसभेसाठी सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राजस्थान विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी मतदान होत आहे. अलवरच्या रामगडमधील बसपा उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे निधन झाल्याने मतदान रद्द करण्यात आले आहे. राजस्थानात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळत आहे. राजस्थानच्या 199 जागांवर 5 वाजेपर्यंत 72% तर तेलंगणात 119 जागांवर 3 वाजेपर्यंत 56% मतदान झाले आहे.

UPDATES

> मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी झालरापाटनमध्ये मतदान केले. येथे महिलांसाठी स्पेशल पिंक बूथ तयार केले आहे. राजे म्हणाल्या, शरद यादव यांच्या वक्तव्याने मला अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. भविष्यात असे होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने या वक्तव्याची दखल घ्यावी. शरद यादव म्हणाले होते, वसुंधरांना आराम द्या, त्या फार थकल्या आहेत, फार जाड झाल्या आहेत, आधी सडपातळ होत्या.

> सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत बोलताना म्हटले बहुमत मिळवल्यानंतर आम्ही बसून या विषयावर चर्चा करू.
> केंद्रीय मंत्री राज्यवर्द्धन सिंह राठौर यांनी जयपूरच्या वैशाली नगरमध्ये मतदान केले.
> गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी उदयपूरमध्ये मतदान केले.
> जयपूर, कोटा, बाडमेर, रावतसर आणि झुंझनूसह अनेक जिल्ह्यांत सुमारे 30 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाडाच्या चर्चा आहेत.
> निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्याठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाडाची माहिती मिळत आहे, त्याठिकाणी लगेचच दुरुस्ती केली जात आहे.

> सीकरच्या फतेहपूरमध्ये बूथ क्रमांक 125 मध्ये बोगस मतदानावरून दोन गटांत वाद झाला. समाजकंटकांनी दोन बाइक जाळल्या तसेच निवडणूक विभागाच्या बसचीही तोडफोड केली. त्यामुळे मतदान 30 मिनिटे लांबले होते.
> भरतपूरमध्ये मौरौलीच्या मतदान केंद्र 213 आणि 214 वर मतदानासाठी गेलेले सेवानिवृत्त सुभेदार गोपाल यांच्यावर समाजकंटकांनी चाकूहल्ला केला. पोलिसांनी त्यांना डीग हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
> दौसाच्या बांदीकुईमध्ये सैनी समाजाचे जिलाध्यक्ष कैलाश सैनी यांच्या कारवर काही तरुणांनी दगडफेक केली त्यात त्यांच्या कारची काच फुटली.

असा झाला प्रचार

> भाजपने ५ निवडणूक राज्यांत सर्वात जास्त ताकद राजस्थानात लावली. या ठिकाणी त्यांनी सर्वाधिक वादग्रस्त वक्तव्ये केली. प्रचार सभेचे म्हणाल तर पंतप्रधान मोदी यांनी ५ निवडणूक राज्यांपैकी सर्वात जास्त १२ सभा राजस्थानात घेतल्या. एका सभेद्वारे त्यांनी राज्यातील २०० विधानसभा जागांपैकी सुमारे १६ ते १७ जागांवर प्रभाव टाकला.

> पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानात जवळपास उत्तर प्रदेशएवढ्या सभा घेतल्या. यूपीत त्यंानी ४०३ जागांसाठी २४ सभा घेतल्या होत्या. ज्या ५ राज्यांत मतदान होणार आहे, त्यात मोदी यांनी गुजरातपेक्षाही कमी सभा घेतल्या. पीएम मोदींनी ५ राज्यांत एकूण ३२ सभा घेतल्या. तिथे एकूण ६७९ जागा आहेत. त्यांनी गुजरातमधील १८२ जागांसाठी ३४ सभा घेतल्या होत्या. यात एका सभेतून ५-६ मतदारसंघांवर प्रभाव टाकला.

> मोदींनी एमपी, छत्तीसगड व तेलंगणात एका सभेद्वारे २२ ते २४ जागांवर प्रभाव टाकला

> मोदी यांनी मध्य प्रदेशच्या २३० जागांसाठी १० सभा घेतल्या. म्हणजे एका सभेद्वारे त्यांनी २३ जागांवर प्रभाव टाकला.

> छत्तीसगडमध्ये त्यांनी ९० जागांसाठी ४ सभा घेतल्या. एका सभेतून २२ जागा कव्हर केल्या. िमझोरामच्या ४० जागांवर १ सभा.

> कर्नाटकमध्ये मोदींनी २२४ जागांसाठी २१ सभा घेतल्या. बिहारमध्ये २४३ जागांसाठी त्यांनी ३१ सभा घेतल्या होत्या.

> राहुल यांनी ५ राज्यांत ७७ सभा घेतल्या, राजस्थानात २०, एका सभेने १० जागांवर प्रभाव

> राहुल यांनी राजस्थानात २० सभा घेतल्या, म्हणजे एका सभेतून १० जागांवर त्यांनी प्रभाव टाकला.

> मध्य प्रदेशात राहुल यांनी २१ सभा व ५ रोड शो घेतले. म्हणजे एका सभेतून ११ जागा कव्हर. मिझोराममध्ये त्यांच्या २ सभा.

> छत्तीसगडमध्ये राहुल यांनी ९० जागांसाठी २० सभा घेतल्या. राहुल यांनी तेलंगणात १४ व मिझोरामध्ये २ सभा घेतल्या.

X