आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Live Video Streaming Is Changing The Environment, Emitting 30 Million Tonnes Of Carbon Dioxide In 2018

लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंगमुळे वातावरणावर होत आहेत बदल, 2018 मध्ये झाले 30 कोटी टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका गूगल सर्चमुळे 0.2 ते 7 ग्रामपर्यंत कार्बनचे उत्सर्जन होते
  • डिजीटल टेक्नॉलॉजीमुळे 2025 पर्यंत 08 टक्क्यांपर्यंत उत्सर्जन होण्याची शक्यता आहे
  • डेटा सेंटरमधून होते कॉर्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन

गॅजेट डेस्क- सध्या संपूर्ण जगा व्हिडिओ स्ट्रिमींगचे वेड वाढतच आहे. ओरिजनल आणि नव-नवीन कंटेट असल्याकारणाने लोकांची व्हिडिओ स्ट्रिमींगला पसंती मिळत आहे. पण, नुकतंच झालेल्या एका अभ्यास हे समोर आले आहे की, बराच वेळ व्हिडिओ स्ट्रिमींग केल्याने तुमच्या आसपासच्या वातावरणात बदल होत आङे. शास्त्रज्ञांनी व्हिडिओ स्ट्रिमींगमुळे जलवायू परिवर्तन होत असल्याचे सांगितले आहे. रिपोर्टमध्ये समोर आले आहे की, आपण सहा किलोमीटरपर्यंत गाडी चालवून जितके कार्बन उत्सर्जन करतो, तितके कार्बन उत्सर्जन अर्ध्या तासांच्या व्हिडिओ स्ट्रिमींगमुळे होत आहे.फ्रांसमधील संशोधन संस्था शिफ्ट प्रोजेक्टमध्ये सांगण्यात आले आहे की, जितके कार्बन उत्सर्जन मागच्या वर्षी झाले स्पेनमध्ये झाले, ते पुढील सहा वर्षात दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. यात सर्वात जास्त 34 टक्के लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि हुलुवरुन होत आहे. सध्या जगभरात नेटफ्लिक्स पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2017 आणि 2018 मध्ये कंपनीच्या जागतिक स्ट्रीमिंग सब्सक्रिप्शनमध्ये 53 टक्के वाढ झाली आहे.

डेटा सेंटरमधून होते कॉर्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन
 
आयटी सेक्टरच्या उर्जेवर लक्ष ठेवणारी संस्था ग्रीनपीसच्या गैरी कुकचे म्हणने आहे की, डिजिटल व्हिडिओ भरपूर मोठ्या साइजमध्ये येतात. स्ट्रीमिंग सेवेसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेचा उपयोग डेटा सेंटरकडून केले जाते, जे कॉम्प्यूटर किंवा डिवाइसला डेटा डिलीवर करते. नेचर पत्रिकामध्ये छापलेल्या एका लेखानुसार, "असे डेटा सेंटर जगभरातील कार्बनडायऑक्साइड उत्सर्जनमध्ये 0.3% उत्सर्जन करतात. येणाऱ्या काळात हे वाढणार आहे. अशातच व्हिडिओ पाहण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. कंज्यूमर टेक्नोलॉजी असोसिएशननुसार नॉर्मल स्क्रीन साइज 1997 मध्ये 22 इंच (55 सेंटीमीटर) वरुन वाढून 2021 मध्ये 50 इंच झाली आहे. नेचुरल रिसोर्स डेफेंस काउंसिलच्या एका रिपोर्टनुसार, 4K रिझॉल्यूशन असलेली स्क्रीन हाय-डेफिनेशन स्क्रीनच्या तुलनेत 30% अधिक ऊर्जेचा उपयोग करते.

अशाप्रकारे कमी करू शकता उत्सर्जनला
 
अमेरिकेतील ऊर्जा विभागाच्या डेटा सेंटरचे विशेषज्ञ डेल सर्टरचा दावा आहे की, पुढील 10 वर्षांपर्यंत उर्जेचा वापर आता जसा आहे, तसा ठेवण्यासाठी आयटी आणि डेटा सेंटरच्या उपकरणांमध्ये सुधारणा करायला हवी. विशेषज्ञांचे म्हणने आहे की, व्हिडिओ स्ट्रिमींग पाहणाऱ्यांनी ऑटोप्ले मोडला डिसेबल करुन वायफायवर लोअर डेफिनेशनमध्ये लाइव्ह व्हिडिओ पाहायला हवा. तसेच, मोबाईलवर 3G वर व्हिडिओ पाहणे सर्वात धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.प्रमुख कार्बन उत्सर्जक देश
 
ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट द्वारे केलेल्या अभ्यासानुसार जगातील सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन चीनमध्ये होते. जगात होणाऱ्या एकूण कार्बन उत्सर्जनामध्ये 27 टक्के एकट्या चीनमधून होते. त्यानंतर अमेरिका (15 टक्के) आणि यूरोपीय यूनियन (10 टक्के), त्यानंतर भारताचा चौथा नंबर लागतो. भारतातून 7 टक्के कार्बन उत्सर्जन होते. जगातील कार्बन उत्सर्जनामध्ये या चार देशांमधून 58 टक्के कार्बन बाहेर पडते. 
 

बातम्या आणखी आहेत...