Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | liver disease information in marathi

या 10 गोष्टी आहेत लिव्हरसाठी धोकादायक, जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे द्यावे लक्ष

हेल्थ डेस्क | Update - Nov 11, 2018, 12:07 AM IST

जास्त प्रमाणात साखर, वेदनाशामक औषधाने यकृतावर होऊ शकतो परिणाम

 • liver disease information in marathi

  पचनसंस्थेमार्फत येणारे रक्त पूर्ण शरीरात जाण्याअगोदर शुद्ध करणे, हे यकृताचे काम आहे. हे शरीरामध्ये येणाऱ्या रसायनांना डिटॉक्सिफाय करते. सांची विद्यापीठाचे आयुर्वेद एक्स्पर्ट डॉ. अखिलेश सिंह सांगतात की, आजकालची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे यकृताला नुकसान होते. डॉ. सिंह सांगत आहेत अशाच १० गोष्टींविषयी ज्यापासून यकृताला धोका होऊ शकतो.

  साखर

  साखरेत फ्रक्टोज असते, जे चरबी वाढवण्याचे काम करते. जास्त फ्रक्टोजमुळे यकृताला नुकसान होते. यकृताला निरोगी ठेवण्यासाठी साखरेचा वापर कमीच करावा.


  (MSG)
  मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) हे जास्तीत जास्त चायनीज आणि पॅक्ड फूडमध्ये मिसळले जाते. यामुळे यकृतावर सूज येते. कर्करोगसुद्धा होऊ शकतो.


  लठ्ठपणा
  लठ्ठपणा वाढल्यामुळे यकृतातील पेशींमध्ये चरबी जमा होते. यामुळे यकृत सिरोसिससारख्या समस्या होऊ शकतात. जास्त लठ्ठ आणि मधुमेही लोकांना असे होण्याची शक्यता जास्त असते.


  वेदनाशामक औषध
  पॅरोसिटामॉलसारखे वेदनाशामक औषध अनावश्यक आणि जास्त घेतल्यानेसुद्धा यकृताला नुकसान होऊ शकते. अनेक प्रकारची आैषधे एकत्र घेण्याअगोदर डॉक्टरांना अवश्य विचारा.


  जास्त मीठ
  जास्त मीठ खाल्ल्याने यकृतामध्ये पाणी जमा होते आणि यामुळे यकृतावर सूज येण्याची समस्या होऊ शकते.


  ट्रान्स फॅट
  वनस्पती तूप किंवा ट्रान्स फॅट हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल आयल्सने तयार होतात. यामुळे वजन वाढवण्यासोबतच यकृतालाही यापासून धोका होऊ शकतो.


  मद्यपान
  जास्त मद्यपान हेे यकृत खराब करण्याचे सर्वात मोठे कारण आहे. यामुळे यकृतावर सूज आणि यकृताचे सिरोसिस यांसारखे आजार होऊ शकतात.


  व्हिटॅमिन ए
  व्हिटॅमिन एच्या जास्त सेवनाने यकृत टॉक्सिन निर्माण होतात. एका दिवसात १०,००० आययूपेक्षा जास्त व्हिटॅमिन ए घेतल्याने यकृताला नुकसान पोहोचते.

 • liver disease information in marathi

  शीतपेये 
  शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामध्ये मिसळले जाणारे सॅक्रिनसारखे आर्टिफिशियल स्वीटनर्स यकृताला नुकसान पोहोचवतात. 

 • liver disease information in marathi

  अँटिडिप्रेजंट मेडिसिन 
  नैराश्यामध्ये घेतले जाणारे अँटिडिप्रेजंट औषध यकृताला नुकसान पोहोचवू शकते. जास्त वय असणाऱ्या लोकांना यकृत खराब होण्याचा धोका जास्त असतो. 

Trending