आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Liverfool Champion Football League: Liverpool Out From 16th Round Out; After 14 Years, They Lost In The Final

लीग : लिव्हरपूल १६ व्या फेरीतून बाहेर; १४ वर्षांनी बाद फेरीत पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन/पॅरिस - सध्याचा चॅम्पियन लिव्हरपूल चॅम्पियन लीगच्या १६ व्या फेरीतून बाहेर झाला. १६ व्या फेरीतील दुसऱ्या लेगमध्ये स्पॅनिश क्लब अॅथलेटिको माद्रिदने इंग्लिश क्लबला ३-२ ने हरवले. पहिला लेग अॅथलेटिकोने १-० ने जिंकला होता. संघाने सरासरी ४-२ ने विजय मिळवला.लिव्हरपूलला १४ वर्षांनंतर बाद फेरीत दोन्ही लेगमध्ये पराभव केला. यापूर्वी २००५ मध्ये १६ व्या फेरीत बेनफिकाने दोन्ही लेगमध्ये लिव्हरपूलला हरवले होते. इतर एका सामन्यात पॅरिस सेंट जर्मनने (पीएसजी) बोरुसिया डॉर्टमंडला २-० ने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पीएसजी संघ ४ वर्षांनी क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले. ९० मिनिटे लिव्हरपूल १-० ने होता आघाडीवर


घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लिश टीम लिव्हरपूलने चांगली सुरुवात केली होती. ४३ व्या मिनिटाला विज्नाल्डमने गोल करत लिव्हरपूलला १-० ने आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. पहिला लेग अॅथलेटिकोने १-० ने जिंकला होता. अशा प्रकारे १-१ गोलने बरोबरी साधली. त्यानंतर अतिरिक्त ३० मिनिटे वेळ देण्यात आला. ९४ व्या मिनिटाला फरमिन्होने गाेल करत लिव्हरपूलला २-० ने आघाडी मिळवून दिली. लोरेंटने ९७ व्या व १०५+१ व्या मिनिटाला गोल करत २-२ ने बरोबरी साधली. अखेर मोराटाने (१२०+१) गोल करत अॅथलेटिकोला ३-२ ने अजेय आघाडी मिळवून दिली. 

पीएसजीने सलग ३२ व्या सामन्यात गोल केला


फ्रेंच क्लब पीएसजीने जर्मन क्लब डॉर्टमंडविरुद्ध घरच्या मैदानावर चांगली सुरुवात केली. २८ व्या मिनिटाला नेमारने गोल करत पीएसजीला १-० ने आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये अतिरिक्त वेळेत (४५+१) बर्नाटने गाेल करत टीमला २-० ने अजेय आघाडी दिली. पहिल्या लेगमध्ये टीमला १-२ ने पराभव झाला. अशा प्रकारे पीएसजी एकूण ३-२ गोलने विजयी झाला. कोरोना व्हायरसमुळे चाहत्याविना सामना खेळवण्यात आला. मात्र, सामन्यात नंतर स्टेडियमबाहेर चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. पीएसजीने युरोपियन स्पर्धेच्या ८ सामन्यांत जर्मन टीमविरुद्ध एकही सामना गमावला नाही. पीएसजीने सलग ३२ व्या चॅम्पियन लीग सामन्यात कमीत कमी एक गोल केला.
 
 

बातम्या आणखी आहेत...