आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Liverpool Leaves Five star Hotel, Due To Even Staff Is Working For Twelve Hours They Get Less Payment

बारा तास काम करूनही स्टाफला कमी वेतन मिळत असल्याने लिव्हरपूलने पंचतारांकित हाॅटेल साेडले!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा : लिव्हरपूलचा फुटबाॅल संघ सध्या क्लबच्या विश्वचषकासाठी कतार येथे दाखल झाला आहे. पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात हाेईल. त्यामुळे संघ तयारीच्या दृष्टीने याठिकाणी दाखल झाला आहे. या साठी टीमच्या खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था पंचतारांकित हाॅटेलमध्ये करण्यात आली हाेती. मात्र, दाेन तीन दिवस येथे राहिल्यानंतर टीमने अचानक ही पंचतारांकित हाॅटेल साेडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. येथील पंचतारांकित हाॅटेलकडून येथील स्टाफची माेठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात असल्याचे लिव्हरपूल क्लबने जगासमाेर आणले. या सर्व स्टाफच्या मानवाधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. राेज १० ते १२ तास राब राबूनही या कर्मचाऱ्यांच्या हातात कमी प्रमाणातील वेतन ठेवले जाते. यासारख्या पिळवणुकीवर क्लबने फाेकस टाकला. या स्टाफला याेग्य प्रकारचा न्याय मिळावा आणि त्याच्या अशा प्रकारे हाेत असलेले शाेषण थांबावे, याच उद्देशाने बहिष्कार टाकत हाॅटेल साेडली.

उष्ण तापमानात प्रचंड हाल 
सध्या कतार येथे प्रचंड उकाड्याचे वातावरण आहे. अशा ४५ डिग्री सेल्सियसच्या तापमानातही दिवसभर हा सर्व स्टाफ काम करत आहे. अशा त्यांचे माेठे हाल हाेत आहे. मात्र, याकडे प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे. या सर्वांना राबवून, शेवटी सर्वांच्या हातावर दिवसांकाठी ७०० रुपये ठेवले जातात, त्यामुळे ही सर्व काही मिळकत तुटपुंजी असल्याचे समाेर आले आहे. याच कारणामुळे लिव्हरपूल क्लबने हाॅटेल साेडली आहे.

कामासाठी दुसऱ्या देशातील कामगार
कतार येथे पर्यटनाच्या दृष्टीने आणि स्पाेर्ट्‌्ससाठी माेठ्या संख्येत खेळाडू, पर्यंटक येत असतात. हे सर्व दाेहासह कतार येथील पंचतारांकित हाॅटेल्समध्ये राहतात. या दरम्यान हाॅटेलमध्ये थांबलेल्या सर्वांच्या सेवेसाठी माेठ्या संख्येत तुंटपुज्या वेतनावर अनेक कर्मचारी ठेवण्यात आले. हा सर्व स्टाफ हा दुसऱ्या देशातील आहे. त्यामुळे त्यांचे याठिकाणी शाेषण केले जाते.