Home | Business | Auto | Livewire is Harley-Davidson's first electric motorcycle

या Super Bike ला पेट्रोल डीझेलची नाही गरज; हार्ले-डेव्हिडसनने सादर केली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 04:24 PM IST

हार्ले-डेव्हिडसन कंपनी प्रत्येक क्रूझ बाइक लव्हरची पहिली पसंत आहे.

 • Livewire is Harley-Davidson's first electric motorcycle

  ऑटो डेस्क - जगभरात पेट्रोल डीझेलची तंटा आणि वाढत्या इंधन दरांसह प्रदूषण टाळण्याच्या हेतून सध्या सर्वच मोटरसायकल कंपन्या इलेक्ट्रिक बाइककडे लक्ष देत आहेत. दर महिन्याला विविध कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक बाइक बाजारात आणत आहेत. त्यातच आता जगातील प्रत्येक क्रूझ बाइक लव्हरची पहिली पसंत असलेली कंपनी हार्ले-डेव्हिडसनने आपली पहिली इलेक्ट्रिक मोटारसायकल लाँच केली आहे.

  पॉवर संदर्भात तडजोड नाहीच...

  - 2014 पासून या इलेक्ट्रिकल मोटारसायकलवर काम सुरू होते. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही बाइक बाजारात उपल्बध होईल. कंपनीने दावा केला आहे, की मॅग्नेटीक मोटर असलेल्या या गाडीच्या पॉवर संदर्भात कुठलाही कॉम्प्रमाइझ करण्यात आलेला नाही. या गाडीला लिथियम-आयन बॅटरीमधून उर्जा मिळते (हेड लाईट, हॅार्न, टीएफटी डिस्प्ले या पार्ट्सला 12-व्होल्टने पॉवर सप्लाय होतो) ज्याला तुम्ही घरातील कुठल्याही सॉकेटवर लावून चार्ज करू शकता.

  - ऑल-अॅल्युमिनियम चेसिस, ब्रेम्बो ब्रेक्स आणि पूर्णपणे अॅड्जस्टेबल सस्पेनशनमुळे ही बाइक रायडरला नेहमीच आरामदायी अनुभव देते. यासोबतच बाइकमध्ये ABS असल्यामुळे गाडीवर कंट्रोल चांगले राहील. हार्लेच्या इतर बाइकप्रमाणे या गाडीमध्ये स्टायलिंगवर अधिकाधिक लक्ष देण्यात आले आहे. बाइकला अॅनोडाइज्ड जस्ताचा लुक देण्यासाठी विशिष्ट प्रकारचा पेन्ट वापरण्यात आला आहे.

  - बाइकची किंमत आणि इतर Specs जाणून घेण्यासाठी आपल्याला 2019 ची वाट पाहावी लागेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

 • Livewire is Harley-Davidson's first electric motorcycle
 • Livewire is Harley-Davidson's first electric motorcycle

Trending