आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूगल कर्मचाऱ्यांवर व्हॅनमध्ये राहण्याची वेळ, पैसे वाचवण्यासाठी घेतला ऑफिसमागे राहण्याचा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया(अमेरिका)- मोटार गाड्यांचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी केला जातो. पण कॅलिफोर्नियाच्या माउंटेन व्ह्यू भागातील कर्मचारी याचा उपयोग घरासारखा करत आहेत. येथे जगातील सर्वात मोठी कंपनी 'अल्फाबेट' (गूगलची पॅरेंट कंपनी) चे मुख्यालय आहे. मागील काही दिवसात घरांच्या किरायामध्ये झालेली वाढ याचे मोठे कारण आहे.


माउंटेन व्ह्यूमध्ये घराचा किराया सरासरी 2.89 लाख रुपये
या भागात घरांच्या किरायामध्ये खूप वाढ झाल्याने, कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे भाडे परवडत नसल्याने, व्हॅनमध्ये राहावे लागत आहे. यामध्ये गूगलसहित इतर अनेक टेक कंपन्यांच्या तरूण कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. माउंटेन व्ह्यूमध्ये घराचा किराया सुमारे 4151 डॉलर (2.89 लाख रुपये) आहे. हा किराया 2010 च्या तुलनेत जवळपास दु्प्पट आहे. तसेच येथील टेक कंपन्यामध्ये काम करणाऱ्या तरूणांचा पगार 10 हजार डॉलरपेक्षा कमी असल्यामुळे ते एवढा किराया नाही देऊ शकत नाही. तर, व्हॅन 800 डॉलर ( 55 हजार रुपये) दरमहिना किरायाने मिळतात. म्हणून कमी पगार मिळणारे कर्मचारी व्हॅनमध्ये राहण्याला प्राधान्य देत आहेत.

 

या भागात 2010 मध्ये फ्लॅटची किंमत सरासरी 5.22 कोटी रूपये होती. आता ही वाढून 12.54 कोटी रूपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळेच या ठिकाणी घर खरेदी करणे आणखी महाग झाले. माउंटेन व्ह्यूला सिलिकॉन व्हॅलीच्या टेक बुमचे मुख्य स्थान मानले जाते. त्यामुळेच येथून अनेक लोक कोट्याधीश झाले. पण घराची समस्या मोठ्या प्रमाणात समोर आली असून ही समस्या एवढी वाढली आहे की, यूएनने हे मानवाधिकारचे उल्लंघन आहे असे सांगितले. मागील वर्षी डिसेंबरमध्ये माउंटेन व्ह्यू मध्ये 300 व्हॅनचा वापर घरांच्या स्वरूपात होत होता. त्यासोबतच जवळपासच्या भागातही इतक्याच व्हॅन होत्या. तिकडे, माउंटेन व्ह्यू सिटी काउंसिलने रस्त्यावर गाडी लावण्यासाठी बंदी घातली आहे, यामुळे व्हॅनमध्ये राहणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...