Home | National | Madhya Pradesh | living relationship girl committed suicide by hanging in Indore

बस स्टँडवर रिसीव्ह करण्यासाठी नाही आला ब्वॉयफ्रेंड, व्हिडीओ कॉलवर म्हणाली तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाहीये, नंतर उचलले भयंकर पाऊल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 02:24 PM IST

तीन महिन्यांपासून होती लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये

 • living relationship girl committed suicide by hanging in Indore

  इंदुर- युवकासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एमए फर्स्ट ईअरच्या विद्यार्थिनीने गळफास घेउन आत्महत्या केली. मुलगी गावावरून परत आली होती आणि तिने मुलाला बस स्टँडवर घ्यायला रिसीव्ह करण्यासाठी बोलवले होते, पण नोकरीवर असल्यामुळे तो येऊ शकला नाही. त्यानंतर तिने रूमवर जाऊन मुलाला व्हिडीओ कॉल केला आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली. काही वेळानंतर मुलगा रूमवर गेला, पण तोपर्यंत मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलगा आणि मुलगी सोबत राहतात याची माहिती मुलीच्या पालकांना नव्हती.


  मुलगा म्हणाला-मी ऑफीसमध्ये आहे नाही येऊ शकत
  छत्रीपूरा टीआय संतोष सिंह यादव यांनी सांगितले, पायल रावत(22) 4 वर्षांपासून इंदुरमध्ये राहत होती. ती 3 महिन्यांपासून अर्जुन बघेल (25) सोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये समाजवाद नगरमध्ये एकाच रूममध्ये राहत होते. युवक पोस्ट ऑफीसमध्ला एका अधिकाऱ्याची गाडी चालवतो. मुलगी 31 डिसेंबरला गावाला गेली होती, शनिवारी दुपारी 4 वाजता गंगवाल बस स्टँडवर आली आणि अर्जुनला कॉल करून रीसीव्ह करायला ये असे सांगितले. पण अर्जुन नोकरीवर असल्यामुळे येऊ शकला नाही. त्यानंतर तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाहीये, मी आत्महत्या करेल अशी पायलने धमकी दिली. अर्जुनने याला गांभीर्याने न घेता तिला घरी जाण्यासाठी सांगितले.


  वडिलांनाही केला कॉल
  मुलगी रूमवर येताच वडिलांना कॉल करून सुखरूप पोहचले असे सांगितले. त्यानंतर तिने अर्जुनला व्हिडिओ कॉल करून आपला राग व्यक्त केला. अर्जुन नोकरीवरून अंदाजे 11 वाजता रूमवर आला. त्याने दार ठोठावले पण पायलने उघडने नाही, त्यानंतर त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले आणि पाहिले की पायलने आत्महत्या केली आहे. अर्जुने त्यानंतर पोलिसांना कॉल केला आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रूमला सील केले असून पुढील तपास सुरू आहे.

Trending