आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच घरात 2-2 प्रेयसींसोबत राहतो हा तरुण; कधीच होत नाही भांडण, मग समोर आले हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्टिन - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात राहणारा अॅडम लियोन्स याला लोक नशीबवान व्यक्ती म्हणतात. त्याच्या दोन गर्लफ्रेंड आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही गर्लफ्रेंडसोबत तो एकाच घरात राहतो. ब्रूक शेड आणि जेन शलाखोवा असे त्या दोघींची नावे आहेत. त्याला प्रेयसींपासून तीन मुले सुद्धा आहेत. अॅडमने सांगितल्याप्रमाणे, ते सगळेच एकाच बेडवर झोपतात. त्याने नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या फॅमिली लाइफबद्दल काही खुलासे केले आहेत. तसेच दोन गर्लफ्रेंड्ससोबत राहण्याचे रहस्य देखील उलगडले.


2 गर्लफ्रेंड्समुळे आयुष्य बनले सोपे
- अॅडमच्या घरात 3 मुले आहेत. सोबतच आणखी एक पाहुणा घरात येणार आहे. त्याची गर्लफ्रेंड जेन पुन्हा गर्भवती आहे. ते सगळेच एकाच घरात राहतात. अॅडम एक सायकोलॉजी फर्म चालवतो. दोन-दोन गर्लफ्रेंड्सने त्याची लाइफ कठिण नव्हे तर आणखी सोपी बनली आहे. आपण तिघे मिळून प्रत्येक काम वाटून घेतो आणि कुटुंबातील प्रत्येक कामाचे व्यवस्थापन करतो. घरात तिघे एकत्रित राहतो आणि प्रत्येकाला आपले निर्णय स्वतःच घेण्याचे स्वातंत्र्य आहे असे अॅडमने सांगितले. 
- पाश्चात्य देशांमध्ये अशा प्रकारच्या कुटुंबांना कपल नव्हे, तर ट्रपल असे मानले जाते. लग्न झाले नसल्याने कुणावरही काहीच निर्बंध नाही. ते सगळेच आपले निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. अॅडम सांगतो, "आमचे असे अनेक मित्र आहेत जे नॉर्मल पती-पत्नी किंवा कपल आहेत. ते दोघेही नोकऱ्या करतात. पंरतु, त्या दोघांना आपले घर मॅनेज करणे खूप कठिण जाते. त्यांच्या तुलनेत आमचे दैनंदिन आयुष्य खूप सहज आणि सोपे आहे. कारण आम्ही तिघे आहोत."


बायसेक्शुअल आहे गर्लफ्रेंड
- अॅडमने सांगितल्याप्रमाणे, "आम्ही घरातील सर्वच कामे एकमेकांमध्ये वाटून करत असतो. सेक्सच्या बाबतीत सुद्धा असेच आहे. आम्ही तिघे रात्री एकाच बेडवर झोपतो. यावरून आमच्या तिघांमध्ये किती प्रेम, जिव्हाळा आणि समजुतदारपणा आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो."
- या तिघांपैकी अॅडम आणि ब्रूक शेड यांची भेट एका नाइटक्लबमध्ये झाली होती. त्याच ठिकाणी ब्रुक एक बायसेक्शुअल असल्याचे अॅडमला कळाले. बायसेक्शुअलमध्ये एखाद्या व्यक्तीला स्त्री आणि पुरुष हे दोघेही सेक्शुअली आकर्षित करतात. यानंतर अॅडम आणि ब्रूक यांनी जेन हिची भेट घेतली. एकमेकांच्या लैंगिक गरजा समजून घेत त्या तिघांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. 
- शेड सांगते, "मी अॅडमसोबत रिलेशनशिपमध्ये आहेच. जेन सुद्धा माझी पार्टनर आहे. त्यामुळे आम्हा तिघांमध्ये खूप चांगले संबंध आहेत. आम्ही एकमेकांना समजून घेतो. त्या दोघांकडून मला सर्व काही मिळते. ते जे माझ्यासाठी करतात ते कुणीही करू शकत नाहीत. अॅडम माझ्या आणि जेन या दोघींसाठी एक इमोशनल सपोर्ट आहे. तोच आम्हाला नेहमी काही चांगले आणि पॉझिटिव्ह करण्यासाठी प्रोत्साहित करतो."


तिसरीकडून एक आपत्य...
अॅडमने ब्रूक शेडकडून एक 7 वर्षांचा मुलगा आहे. तर जेनकडून एक 2 वर्षांचा मुलगा आहे. अॅडमच्या तिसऱ्या महिलेशीही संबंध होते. त्या महिलेकडून अॅडमला आणखी एक मुलगा असून तो सुद्धा याच घरात राहतो. अॅडमचा तिसरा मुलगा जेन आणि ब्रूक या दोघींना आई म्हणतो.

बातम्या आणखी आहेत...