आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनधन खात्यांवरील कर्जाची मर्यादा दुप्पट १० हजार रुपये हाेणार; लाल किल्ल्यावरून घाेषणेची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ग्रामीण भागातील गरीब-दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जनधन योजनेला १५ ऑगस्ट रोजी चार वर्षे पूर्ण होत अाहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेबाबत काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. विशेषत: या खात्यावर मिळणाऱ्या कर्जाची ५ हजार रुपयांची मर्यादा दुप्पट म्हणजे १० हजार रुपये केली जाण्याची शक्यता आहे.


बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेल्या  लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी  ही योजना सुरू करण्यात आली होती. १५ ऑगस्ट २०१४ रोजी घोषित करण्यात आलेली ही योजना प्रत्यक्षात २८ ऑगस्टला सुरू झाली होती. यानंतर गरीबांनी मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडली होती. या खात्यावर संबंधितांना लाभ देण्याच्या दृष्टीने आता आणखी प्रयत्न केले जातील.


- ३२.२५ कोटी जनधन खाती चार वर्षांत उघडली
- ८० हजार ६७४ कोटी रुपये खात्यांवर रक्कम


सध्याचा लाभ
जनधन खाते सहा महिने नियमित चालले तर खातेदारास बँकांकडून ५ हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. ही मर्यादा दुप्पट म्हणजे १० हजार रुपये केली जाऊ शकते.


आकर्षक मायक्रो इन्शूरन्स
१५ ऑगस्टच्या भाषणात मायक्रो इन्शुरन्स स्कीमचीही घोषणा माेदी करू शकतात. रुपे कार्डधारकांसाठी विम्याची रक्कम १ लाख रुपयांनी वाढवली जाऊ शकते.


झुंडशाहीतून हत्या, ही तर विकृतीच
झुुंडशाहीतून होत असलेले हत्यांचे प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. महाआघाडी, एनआरसी यादी, २०१९ ची निवडणूक आणि अर्थव्यवस्थेवरही त्यांनी मोकळेपणाने भाष्य केले. झुंडशाहीविरुद्ध राजकारण सोडून एकत्र येण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. यातून होणाऱ्या हत्या गंभीर गुन्हा असून यावरून राजकारण करणे म्हणजे या घटनांची क्रूर चेष्टा ठरेल, असेही मोदी म्हणाले. झुंडशाहीतून घडलेल्या हत्याकांडात २०१४ पासून ३ मार्च २०१८ पर्यंत ४५ लोक मारले गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...