आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४७ साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून ११८६ कोटींचे कर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- साखरेला दर नसल्याने अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना थकीत एफआरपीबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन, किरकोळ दुरुस्ती या कारणासाठी राज्य शिखर बँकेने मदतीचा हात दिला आहे. राज्यातील ४७ साखर कारखान्यांना १ हजार १८६ कोटी रुपयांची अल्प मुदतीचे कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांना ३२० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. आणखी काही कारखान्यांकडून प्रस्ताव प्राप्त आहेत, त्यासही मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांनी दिली. 


राज्यातील साखर कारखान्यांनी अल्प मुदत कर्जासाठी प्रस्ताव सादर केले होते, यामध्ये किरकोळ दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, थकीत एफआरपी आदींसाठी कर्जाची मागणी केली आहे. ज्या कारखान्यांकडे एफआरपीपोटी ऊसबिलांची थकीत रक्कम आहे, त्या कारखान्यांना तातडीने कर्ज मंजूर केले जात आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी कारखान्यास ६५ कोटी, मकाईस ११.२० कोटी, आदिनाथ कारखान्यास २० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वरसह इतर कारखान्यांचे प्रस्ताव प्राप्त आहेत. त्या कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे महागावकर यांनी सांगितले. 


या साखर कारखान्यांना अल्प मुदतीचे कर्ज 
सहकारमहर्षी ४८.६२ कोटी, आदिनाथ २० कोटी, लोकमंगल अॅग्रो १५ कोटी, लोकमंगल भंडारकवठे ४० कोटी, विठ्ठल सहकारी ५४ कोटी, विठ्ठल कार्पोरेशन २१ कोटी, संत दामाजी १९.२८ कोटी, मकाई ११.२० कोटी, भीमा सहकारी कारखान्यास ६५ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. ज्या कारखान्यांनी प्रस्ताव दिले आहेत त्या कारखान्यांना कर्ज मंजूर केले जाणार आहे. सोलापूरशिवाय पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांना कर्जे दिली आहेत. 

बातम्या आणखी आहेत...