आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यावर ४ लाख ७० हजार काेटींचे कर्ज; कर्जमाफीस पैसे येणार कुठून?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोद यादव 
मुंबई - राज्यात सत्तास्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या नव्या आघाडीचे किमान समान कार्यक्रमात सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या सातबारा काेरा करण्यावर एकमत झाले आहे. नवे मुख्यमंत्री सत्तारूढ हाेताच ही लाेकप्रिय घाेषणाही केली जाईल. मात्र आधीच महाराष्ट्रावर ४.७० लाख काेटींचे कर्ज असताना शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी आणखी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या धुरिणांना पडलेला आहे. 

किमान समान कार्यक्रमाबाबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना विचारणा केली असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मागच्या भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचे पाप केले. ५० टक्के शेतकऱ्यांनाही याेजनेचा लाभ मिळाला नाही, असा आराेप त्यांनी केला. ‘नियमित कर्जमाफी मिळेल तरी कशी?’ असेही त्यांनी कबूल केले. विधानसभा निवडणुका जाहीर हाेण्यापूर्वीच राज्यात ५० लाख ८५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी २३ हजार ८१७ काेटी रुपये मंजूरही केले हाेते. यापैकी सुमारे ४३ लाख १८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कृषी कर्जमाफीचे १८ हजार काेटी जमाही झाले आहेत, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे.सरसकट कर्जमाफीची घाेषणा पूर्ण करण्याबाबत पेच


देवेंद्र फडणवीस यांनी जून २०१७ मध्ये कृषी सन्मान याेजनेअंतर्गत कर्जमाफीची घाेषणा केली हाेती. याअंतर्गत ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार हाेती. यावर सरकार ८९ लाख काेटी खर्च करणार हाेते. राज्यावर आधीच कर्जाचा डाेंगर असल्यामुळे बँकांना कर्ज परतफेडीचा रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचा करार करून सरकार शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ देणार हाेती.
केंद्राकडे हाेऊ शकते मागणी :


महाराष्ट्राच्या तिजाेरीत खडखडाट असल्याने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी नवे सरकार केंद्राकडे निधीची मागणी करू शकते. मात्र केंद्राने यापूर्वीच एखाद्या राज्याला स्वतंत्रपणे असे पॅकेज देता येत नसल्याचे जाहीर केलेले आहे.


> महाराष्ट्रावर एकूण कर्ज : 4,71,642 काेटी


> वेतन, पेन्शन, व्याजावरील खर्च : 1,86,816 काेटी 


> महसुली व भांडवली उत्पन्न मिळून एकूण बजेट : 4,04,526.70 काेटी


> यात महसुली, भांडवली व विकास कामांवरील खर्च :  4,04,794.19 काेटी


> जूनमध्ये सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात महसुली घाटा : 20,293 काेटी रुपये


> एकूण प्राप्त महसुलापैकी 59.37% रक्कम यावर खर्चशेतकऱ्यांवरील सरासरी कर्ज
 
केरळ    2.13 लाख रुपये 

आंध्र प्रदेश    1.23  लाख रुपये 

पंजाब    1.19 लाख रुपये 

तामिळनाडू    1,15,900 रुपये 

कर्नाटक    97,200 रुपये 

तेलंगणा    93,500 रुपये 

हरियाणा    79 हजार रुपये 

राजस्थान    70 हजार रुपये 

महाराष्ट्र    54,700 रुपये बातम्या आणखी आहेत...