आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारी काकासह पीडित पुतणीला जीवंत जाळण्याचे आदेश; झारखंडच्या महापंचायतीचे तुगलकी फर्मान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झारखंडच्या चायबसा जिल्ह्यातील मंझारी गावात भरलेली महापंचायत. - Divya Marathi
झारखंडच्या चायबसा जिल्ह्यातील मंझारी गावात भरलेली महापंचायत.

जमशेदपूर - झारखंडच्या चायबसा जिल्ह्यातील मंझारी गावात एका काकाने आपल्याच 13 वर्षांच्या पुतणीवर बलात्कार केला. या अत्याचारातून चिमुकलीला गर्भधारणा झाल्यानंतर प्रकरण महापंचातयीकडे पोहोचले. गावात सर्वांसमोर 28 वर्षीय आरोपी काका रॉबिनने आपल्या पाशवी कृत्याची कबुली देखील दिली. परंतु, यानंतर पंचांनी जो निकाल दिला तो धक्कादायक आहे. महापंचायतीने आरोपीकडून पीडितेच्या कुटुंबियाला 5 लाख रुपये दंड देण्यास सांगितले. यानंतर आरोपीसह पीडितेला सुद्धा जीवंत जाळून मारण्याचे आदेश दिले. 


गेल्या आठवड्यातच एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्यानंतर ती गर्भवती झाल्याचे प्रकरण समोर आले. आरोप तिच्या सख्ख्या काकावर लागले. गावकऱ्यांनी यासंदर्भात महापंचायतीकडे तक्रार केली तेव्हा आरोपी काका रॉबिनले सभेत बोलावण्यात आले. त्यावेळी तो महापंचायतीसमोर आला नाही. तेथे पोहोचलेल्या आरोपीच्या नातेवाइकांनी रॉबिन निर्दोष असल्याचा दावा केला. यानंतर आदिवासी हो समाजाची महासभा आणि मसकल महिला समिती सामाजिक सहकार्य संस्थेने पुढाकार घेतला. या दोन्ही संस्थांच्या मध्यस्थीने मंगळवारी पुन्हा महापंचायत बोलावण्यात आली. त्याच पंचायतीमध्ये आरोपीने आपला गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आदिवासी हो समाजाच्या युवा महासभेचे जिल्हाध्यक्ष गब्बरसिंह हेम्ब्राम यांनी हा वादग्रस्त आदेश दिला. 


3 वर्षांपासून सुरू होता अत्याचार
उल्लेखनीय बाब म्हणजे, पाडितेचे वय फक्त 13 वर्षे आहे. तसेच आरोपी काका तिच्यावर गेल्या 3 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता. पोलिस महानिरीक्षक क्रांती कुमार यांनी आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...