आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेठी - काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रथमच अमेठीच्या दौऱ्यावर आले. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत राहुल पक्ष कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘मी अमेठी सोडणार नाही. हे माझे घर-कुटुंब आहे. मी आणि प्रियंका गांधी येथे येतच राहू. मी अमेठीचा विकास थांबू देणार नाही. मी वायनाडचा खासदार असलो तरी अमेठीशी माझे तीन पिढ्यांचे नाते आहे. मी दिल्लीत अमेठीची लढाई लढत राहीन. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी काम केले, पण स्थानिक नेते जनतेपासून दूर राहिले. त्यामुळे माझा पराभव झाला.’ राहुल गांधी यांनी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. बहुतेक कार्यकर्त्यांनी कमकुवत संघटनेमुळे आणि प्रशासनाने केलेल्या घोटाळ्यामुळे पराभव झाला, असे मत व्यक्त केले. राहुल गांधी १९९९ पासून सतत अमेठीचे खासदार होते. पण या वेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ५५ हजारपेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव केला होता.
राहुल यांच्याकडून न्यायाच्या मागणीचे पोस्टर : राहुल गांधी अमेठीत पोहोचण्याआधी पक्षाच्या स्थानिक कार्यालयाबाहेर एक पोस्टर दिसले. त्यावर संजय गांधी मेमोरिअल ट्रस्टद्वारे संचालित रुग्णालयाच्या डाॅक्टरांच्या दुर्लक्षामुळे एका व्यक्तीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात न्यायाची मागणी करण्यात आली होती. मे महिन्यात स्मृती इराणी यांनी ट्विट केले होते. त्यात मृतकाच्या नातेवाइकाने आरोप केला होता की, आयुषमान कार्ड नसल्यामुळे डाॅक्टरांनी उपचारास नकार दिला होता. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.
ट्विटरवर राहुल गांधी यांचे १ कोटी फाॅलोअर
राहल गांधी यांनी ट्विटरवर १ कोटी फाॅलोअरचा आकडा ओलांडला आहे. राहुल यांनी अमेठीच्या दौऱ्याआधी ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, ‘एक कोटी ट्विटर फाॅलोअर्स, तुमचे सर्वांचे खूप आभार. मी हे यश अमेठीत साजरे करणार आहे.’ विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर ४.८० कोटी फाॅलोअर आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.