आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांत ८०% आरक्षण देऊ, युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासन, तरुणांकडून मागवल्या सूचना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने नुकताच ‘वेक अप महाराष्ट्र’ उपक्रम राबवला होता. यातील विविध उपक्रम, स्पर्धा, माध्यमांद्वारे राज्यातील तरुणांनी उस्फूर्त सहभाग घेत अनेक सूचना दिल्या. त्यावर चर्चा करून ‘महाराष्ट्र ४.०’ हा तरुणांचा जाहीरनामा आखण्यात आला आहे. त्यात भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांत ८० टक्के आरक्षण देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. खास युवकांसाठी बनवलेला देशातील हा पहिलाच जाहीरनामा असल्याचा दावा युवक काँग्रेसने केला आहे. या बाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले,  आमचे सरकार आल्यानंतर जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीचा संपूर्ण आराखडा तयार आहे. यामुळे युवकांच्या समस्या मिटणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.” 
 

शिक्षण
1. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या सर्व शैक्षणिक कर्जांना माफी. 
2. प्रमुख शहरात वसतिगृहांची संख्या वाढवली जाईल. 
3. दिव्यांग युवकांसाठी विनामूल्य उच्च शिक्षण

रोजगार
1. बेरोजगारांना रु. ५००० बेरोजगारी भत्ता दिला जाईल.
2. महापरीक्षा पोर्टल बंद केले जाईल.
3. 1,91,000 रिक्त सरकारी नोकऱ्यांची भरती पहिल्या १८० दिवसांत करू.
4. भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांत ८०% आरक्षण देण्यासाठीचा कायदा करू.
 

सशक्तीकरण
1. स्वतंत्र युवक कल्याण विकास मंत्रालय स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात युवा माहिती केंद्र स्थापन
2. जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विकसित केले जाईल.
 

आरोग्य आणि जीवनशैली
1. राज्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी.
विनामूल्य
सार्वजनिक वाहतूक सेवा, पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी
3. सर्व गड-किल्ल्यांची दुरुस्ती व पर्यटनाला चालना देण्यात येईल.
 

बातम्या आणखी आहेत...