आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक जनशक्ती पक्ष गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी: तृणमूल कॉंग्रेसच्या पाठोपाठ लोक जनशक्ती पक्षानेही गोव्यात प्रवेश केला आहे. गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत किमान 25 मतदार संघात निवडणूक लढविण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे, अशी माहिती लोक जनशक्ती पक्षाचे गोवा निरीक्षक मुकेश गुज्जर व प्रदेशाध्यक्ष गजेंद्रनाथ उसगावकर यांनी दिली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राम विलास पासवान यांनी पाचही राज्यात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील कार्यकारिणी 22 जानेवारीला होणार्‍या बैठक जाहीर करण्यात येणार आहे. मागास जाती-जमाती व इतर मागास वर्गीयांना न्याय मिळवून देण्यासाठी गोमंत बहुजन समाज परिषदेचे कार्यकर्ते गोव्यात गेली 25 वर्षे काम करीत आहे. या परिषदेचे आता वरील पक्षात विलिनीकरण करून गोव्यात राजकीय शक्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बहुजनसमाज परिषदेचे हजारो कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात विखुरलेले आहेत. मागास जमातीच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी पाया उभारण्याचे काम परिषदेने केले आहे. त्यामुळे हा समाज या निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर राहणार हे येणार्‍या काळात स्पष्ट होईल, असे गुज्जर व उसगावकर यांनी सांगितले. कॉंग्रेस असो किंवा भाजपा, या दोन्ही पक्षांनी मागास जमातीच्या प्रश्‍नांचे निवडणुकीसाठी भांडवल म्हणूनच उपयोग केल्याचा आरोप उसगावकर यांनी केला. पत्रकार परिषदेस के. एच. भोसले उपस्थित होते.