Home | National | Delhi | lok sabha 2019 election date announce

11 एप्रिल ते 19 मेदरम्यान सात टप्प्यांत मतदान, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले तर  cVIGIL अॅपवर तक्रार करू शकता 

वृत्तसंस्था | Update - Mar 11, 2019, 08:59 AM IST

मतदारांसाठी काय? - आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले तर  cVIGIL अॅपवर तक्रार करू शकतील

 • lok sabha 2019 election date announce


  नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने रविवारी १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली. ५४३ जागांसाठी ११ एप्रिल ते १९ मेपर्यंत ७ टप्प्यांत मतदान हाेईल. २३ मे रोजी निकाल जाहीर होईल. आंध्र, ओडिशा, अरुणाचल व सिक्कीम विधानसभेसाठी लोकसभेसोबतच निवडणूक होईल. यंदा प्रथमच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर होईल. चालू लोकसभेचा कार्यकाळ ३ जूनला संपत आहे.


  मतदारांसाठी काय? - आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले तर cVIGIL अॅपवर तक्रार करू शकतील
  - cVIGILअॅपवर तक्रारीचा व्हिडिओ व फोटो अपलोड करता येईल. प्राधिकृत अधिकारी १०० मिनिटांत स्टेटस सांगतील.
  - व्होटर हेल्पलाईन अॅपच्या माध्यमातून यादीत नाव शोधणे, ऑनलाईन फॉर्म भरणे, मतदार यादीतील आपल्या समावेशासंबंधीचे स्टेटस तपासणे, तक्रारीसाठी मदत िमळेल.
  - सूचना व तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी समाधान अॅप लाँच. १९५० या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता.
  - मतदारांना स्पष्ट कळावे म्हणून ईव्हीएमवर उमेदवाराचे छायाचित्र असेल. सर्वात शेवटी ‘नोटा’चे बटण दिलेले असेल.


  राजकीय नेते, पक्षांसाठी काय? आपल्यावर किती गुन्हे नोंद आहेत ते नेत्यांना तीन वेळा जाहिरात देऊन सांगावे लागेल
  - उमेदवारांना आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल वृत्तपत्र, टीव्हीवर तीन वेळा जाहिरात देऊन माहिती द्यावी लागेल.
  - परदेशातील आपले कुटुंबीय, नातेवाईक यांच्या संपत्तीची माहिती द्यावी लागेल. अर्जात यासंबंधीचा रकाना रिक्त ठेवला तर संबंधित उमेदवाराचा अर्ज फेटाळला जाईल.
  - उमेदवारांना पॅन देऊन ५ वर्षातील रिटर्न दाखवावा लागेल. सत्यापन झालेल्या मीडिया अकाऊंटवरच जाहिरात देता येईल.
  - उमेदवारांना ७० लाखांपेक्षा अधिक खर्च करता येणार नाही. रात्री १० ते स. ६ पर्यंत लाऊडस्पीकरला बंदी. मतदानापूर्वी ४८ तास लाऊडस्पीकर लावता येणार नाही.

  पाचव्या विजयासाठी खैरे, दानवे मैदानात
  राज्यातील ४८ मतदारसंघांत चार टप्प्यांत मतदान हाेणार आहे. यात शिवसेना- भाजप युती विरुद्ध काॅंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी असा मुकाबला हाेईल. मराठवाड्यातील ६ मतदारसंघात युतीचे खासदार आहेत तर दाेन जागा काॅंग्रेसकडे आहेत. आैरंगाबाद व जालन्याचे विद्यमान खासदार अनुक्रमे चंद्रकांत खैरे व रावसाहेब दानवे सलग चार वेळा विजयी झाले असून आता पाचव्या विजयासाठी ते निवडणूक आखाड्यात उतरतील.

Trending