आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका फॅक्ट,आघाडी फॅक्टर; भाजपला यंदा सर्वच नऊ जागा मिळणे अवघडच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गोरखपूर । पूर्वांचलमध्ये सर्वाधिक धार्मिक आस्थेचे आणि राजकारणाचे केंद्र असलेले गोरखनाथ मंदिर. मंदिरासमोर गाेरखनाथ ठाण्यावर मित्रांसह उभे असलेले अशाेक चाैधरी म्हणतात, ‘गोरखपूरमध्ये भाजपचा उमेदवार मंदिरातून असेल तरच त्याचा विजय निश्चित आहे. नाही तर आघाडीचे पारडे जड हाेऊ शकते. पोटनिवडणुकीत मंदिराचा उमेदवार नसल्यामुळे भाजपचा पराभव झाला.’ चाैधरी यांच्या म्हणण्यात राजकारणाची नस दिसून आली. आकडेवारी पाहिल्यास ते सत्य दिसते. १९८९ पासून सतत आठ वेळा गोरक्षपीठाधीश्वर येथूनच गोरखपूरचे खासदार झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी येथून राजीनामा दिला हाेता. मार्च २०१८ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला व सपचे प्रवीण निषाद खासदार झाले.  


राजकीय विश्लेषक मनाेज सिंह म्हणतात, ‘२०१४ मध्ये गाेरखपूर व बस्ती मंडळ परिसरातील सर्व नऊ जागा भाजपने जिंकल्या हाेत्या. या वेळी असे दिसत नाही.’  भाजपने एक-दीड महिन्यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री या विभागाला जास्त वेळ देत आहेत. २४ फेब्रुवारी राेजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शेतकऱ्यांची माेठी सभा घेतली. गोरखपूरमध्ये भाजपची सर्वात माेठी समस्या ही आहे की, योगी आदित्यनाथ यांनी अजूनपर्यंत आपला राजकीय उत्तराधिकारी निश्चित केला नाही. भाजप येथे विकासाच्या आधारावर मत मागणार आहे. परंतु हे कार्ड चालेल याची गॅरंटी नाही. कारण विकास अखिलेश यादव यांनीही केला हाेता, त्यानंतरही त्यांचा पराभव झाला. स्थानिक खासदारांच्या निष्क्रियतेचा फायदा विरोधकांना मिळू शकताे. सप जिल्हाध्यक्ष प्रल्हाद यादव म्हणतात, ‘योगी आदित्यनाथ तपस्येतून वेगळे हाेत राजभोग करत आहेत. यामुळे गोरखनाथ बाबा यांनी सामान्य नागरिकांना आपले आशीर्वाद दिले आहेत.’ काँग्रेसचे वेगळे लढणे व प्रियंका फॅक्टरसंदर्भात ते म्हणतात, त्यांच्या येण्यामुळे आम्हाला फायदा आहे. कारण ३० वर्षांपूर्वी काँग्रेस आली. आज भाजप आहे. काँग्रेस भाजपची मते घेईल. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश यादव म्हणतात,  ‘प्रियंका यांच्या येण्यामुळे महिलांची मते काँग्रेसला मिळतील. कुशीनगरहून आर.पी.एन. सिंह यांचा विजय निश्चित आहे.’ 

 
अंचलमध्ये हिंदू-मुस्लिम समीकरणामुळे डुमरियागंज मतदारसंघ संवेदनशील आहे. येथे ३१ टक्के मुस्लिम मते आहेत. येथील भाजप खासदार जगदंबिका पाल २००९ मध्ये काँग्रेसकडून जिंकले हाेते. बसपचे संभाव्य उमेदवार आफताब आलम चांगली लढत देणार आहेत. जर ७५  वर्षे वयाचा निकष लावत माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांचे तिकीट कापले गेले तर भाजपला आयात उमेदवार द्यावा लागेल. गाेरखपूरच्या राजकारणात याेगींचे विरोधक समजले जाणारे केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला म्हणतात, ‘भाजपने या भागात सर्वच मुद्द्यांना हात लावला आहे. रस्त्यांपासून विमानाच्या कनेक्टिव्हिटीपर्यंत काम झाले आहे. यामुळे सर्वच ९ जागा आम्ही जिंकू.’ प्रियंका गांधींसंदर्भात ते म्हणात, ‘बंद मुठ्ठी लाख की, खुल गई ताे खाक की’ ही म्हण प्रियंका गांधी यांच्यासंदर्भात खरी सिद्ध हाेणार आहे.’ आता पूर्वांचल मतदारांनीही आपली मुठ्ठी बंदच ठेवली आहे. ती मतमाेजणीलाच उघडेल.


सध्याची परिस्थिती
२०१४ च्या  निवडणुकीत सर्व नऊ जागांवर भाजपचा विजय झाला हाेता. मुख्यमंत्री झाल्यावर योगींनी गोरखपूरची जागा साेडली.  मार्च २०१८ च्या पाेटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा विजय झाला.


पूर्वांचलचे गणित
आघाडी : बसप व सपमध्ये आघाडी झाली आहे.  सपकडे महाराजगंज, गोरखपूर व कुशीनगर या तीन जागा आल्या आहेत. बसपकडे उर्वरित सहा जागा बांसगाव, बस्ती, डुमरियागंज, संत कबीरनगर, सलेमपुर, देवरिया आल्या आहेत.


मुद्दे काय आहे?
एन्सेफेलाइटिसने सतत मुलांचा मृत्यू हाेत आहे.  2018मध्ये 280 मुलांचा मृत्यू गोरखपूरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये झाला. प्रो. हर्ष सिन्हा यांच्या मतानुसार, येथील प्रतिव्यक्ती उत्पन्न देशातील  प्रतिव्यक्तीच्या एक तृतीयांशच आहे.


जातींचे गणित?
निषाद, यादव, जाटव व मुसलमानांची मते आपल्यासाेबत असल्याचे सप-बसप आघाडीला वाटते. भाजपला जवळपास 30% सवर्ण मते, मौर्य-कुशवाह, कुर्मी, पासी, चौरसिया व गैर जाटव जातींचा पाठिंबा मिळू शकताे.
 

बातम्या आणखी आहेत...