Home | National | Delhi | Lok Sabha and Assembly elections together in J & K

लोकसभा निवडणूक 7 ते 9 टप्प्यांत शक्य

हेमंत अत्री | Update - Mar 09, 2019, 11:40 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याची तयारी, यामुळे तारखा जाहीर होण्यास उशीर...

  • Lok Sabha and Assembly elections together in J & K

    नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसोबतच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी असून अगदी शेवटच्या टप्प्यात ही योजना आखली गेल्याने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यात विलंब होत आहे. सूत्रांनुसार, सोमवारी किंवा त्यानंतर एक-दोन दिवसांत निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. लोकसभा निवडणूक या वेळीही ७ ते ९ टप्प्यात होईल.


    जम्मू-काश्मीरशिवाय ओडिशा, आंध्र प्रदेश, सिक्कीम व अरुणाचलमध्ये लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक होईल. विविध टप्प्यात घ्यावयाच्या या निवडणुकीच्या कार्यक्रमास अंतिम रूप दिले जात आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा करून विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. शिवाय तेथील सुरक्षा बंदोबस्ताचाही प्रश्न होता. यावर निर्णय झाल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. गेल्या वेळी लोकसभेसाठी देशभर सव्वानऊ लाख मतदान केंद्रे होती. या वेळी यात ८ ते १० टक्के वाढ होऊ शकते. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षी १९ जूनला राज्यपाल शासन लागू झाले हेाते. २१ नोव्हेंबरला राज्यपालांनी विधानसभा भंग केली होती. यानंतर सहा महिन्यातं निवडणूक घेणे गरजेचे आहे.


    त्यामुळे २० मेपर्यंत मतदान घेणे आवश्यक आहे. राज्यपाल शासनाची मुदत १९ डिसेंबरला संपल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. यंदा निवडणुकीत थर्ड जनरेशनची मतदान यंत्रे वापरली जाणार आहेत. यासाठी १६ लाख नवी यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत. यात कोणत्याही प्रकारचे छेडछाड करता येणार नाही.

Trending