आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहेमंत अत्री
नवी दिल्ली - २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीमध्ये देशातील चार प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी खिसे मोकळे करून खर्च केला आहे. ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपने सर्वाधिक १,२६४ कोटी रुपये खर्चले. या हिशेबाने भाजपला एक जागा ४.१७ कोटींत पडली. ७ राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवडणूक खर्च विवरणातून ही माहिती समोर आली आहे. खर्चाबाबत काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ४२१ उमेदवारांवर सुमारे ८२० कोटी रुपये खर्चले आहेत. मात्र पक्षाला केवळ ५२ खासदार जिंकून आणता आले. या हिशेबाने पक्षाला जिंकलेली प्रत्येक जागा १५.७९ कोटी रुपयांत पडली.
सर्व पक्षांना निवडणूक संपल्याच्या ९० दिवसांत खर्चाचे विवरण देणे बंधनकारक आहे. काँग्रेस आणि भाकपने ४२ दिवस उशीर लावत १२ डिसेंबरला माहिती सोपवली. भाजपने २७ दिवस तर राष्ट्रवादीने ५ दिवस उशीर केला. तृणमूल काँग्रेस, बसप आणि माकपने मुदतीत विवरण दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.