आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सार्वत्रिक निवडणूक : आतापासूनच प्रचाराचा धुरळा, भाजप-काँग्रेस नेते लागले तयारीला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभेचे बिगूल अजून पूर्ण वाजलेही नाही. निवडणूक तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी देशात िनवडणूक प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. २६ जानेवारीनंतर भाजप व काँग्रेस पूर्णपणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दोन्ही पक्षांच्या आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीचे आखाडे गाठले आहेत. दररोज प्रचारसभांचा सपाटाच लागला आहे. वेगवेगळ्या राज्यांत सभा, कार्यक्रम घेतले जात आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा दररोज किमान एक ते दोन सभा घेऊ लागलेत. त्याशिवाय संघटनात्मक कार्यक्रमातही त्यांचा सहभाग वाढला आहे. काँग्रेसकडून एकटे राहुल गांधी यांनी प्रचाराची धुरा सांभाळताना दिसून येत आहेत. ते गेल्या १३ दिवसांपासून विविध राज्यांत सातत्याने कार्यक्रम-सभांत दिसून आले.  मोदी-शहा यांच्या जोडीने १३ दिवसांत २२ प्रचारसभा व कार्यक्रम घेतले. त्यापैकी शहा यांनी ६ राज्यांत १४ तर मोदींनी ५ राज्यांत ८ सभआ घेतल्या. त्याशिवाय मोदी दोन शहा यांनी एका कार्यक्रमातही सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी १२ दिवसांत ७ सभा व ५ इतर कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी या सभा सहा राज्यांत घेतल्या. निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. २०१४ मध्ये ७ एप्रिल ते १२ मे दरम्यान ९ टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली होती.


मोदींची रणनीती : पक्ष कमकुवत असलेल्या राज्यांवर लक्ष केंद्रित
भाजप कमकुवत असलेल्या राज्यांवर मोदींनी लक्ष केंद्रित केले आहे. कारण अशा ठिकाणी लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त फायद्याची शक्यता आहे. माेदींनी आतापर्यंतच्या ८ पैकी ३ सभा बंगालमध्ये घेतल्या तर तामिळनाडू व केरळमध्ये गुजरात, छत्तीसगड, जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी एक सभा घेतली. मोदी ५ दिवसांत १० राज्यांचा दौऱ्याची शक्यता आहे.


शहा यांची खेळी : यूपीत पुन्हा बूथ संमेलनाद्वारे प्राण फुंकणार
शहा २०१४ च्या निवडणुकीत पक्षाचे सरचिटणीस व यूपीचे प्रभारी होते. यादरम्यान त्यांनी संघटनेच्या बळकटीसाठी खूप काम केले होते. त्या जोरावर रालोआला यूपीत ८० पैकी ७३ जागा मिळाल्या होत्या. आता पुन्हा शहा यूपीत जुनीच रणनीती अमलात आणतील. ते राज्यात बूथ संमेलनाद्वारे प्राण फुंकणार आहेत.


राहुल शेतकरी कार्ड : शेतकरी संबंधी मुद्दे सतत मांडतायत
तीन राज्यांतील विजयांनंतर राहुल गांधी उत्साही दिसू लागले आहेत. तेव्हा तीन राज्यांत मांडलेल्या मुद्द्यांनाच ते निवडणूक प्रचार सभेत मांडू लागले आहेत. त्यातही शेतकऱ्यांचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. काँग्रेसने ३ राज्यांत शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना आखली होती. आता काँग्रेस सरकारांनी ती लागू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल या राज्यांत शेतकरी आभार रॅली घेत आहेत.


भाजप : मोदींच्या सर्वाधिक ३ सभा बंगालमध्ये, शहा यांनी सर्वात जास्त ६ सभा यूपीत घेतल्या
८ फेब्रुवारी : छत्तीसगड व बंगालमध्ये सभा. जौनपूर व गोरखपूरमध्ये मुक्काम.
६ फेब्रु. : शहा अलिगडमध्ये.
४ फेब्रुवारी : शहांनी आंध्रात २ सभा घेतल्या.
३ फेब्रुवारी : जम्मूत मोदी, आेडिशात शहांची सभा.
२ फेब्रुवारी : बंगालमध्ये मोदींच्या २ सभा, यूपीत अमरोहा व उत्तराखंडमध्ये शहांची सभा.
३१ जानेवारी : अल्पसंख्याक आघाडीशी शहा यांची चर्चा.
३० जानेवारी : गुजरातेत मोदींची रॅली, यूपीत शहांच्या २ सभा.
२९ जानेवारी : शहांच्या बंगालमध्ये १ आेडिशात २ रॅली.
२८ जाने. : हिमाचलमध्ये शहा.
२७ जानेवारी : मोदी त्रिशूर, मदुराई.


काँग्रेस :  राहुल गांधींनी दक्षिण भारतातील ३ राज्यांत ४ सभा घेतल्या, बिहारमध्ये एक
८ फेब्रुवारी : भोपाळमध्ये शेतकरी आभार रॅली.
७ फेब्रुवारी : दिल्लीत अल्पसंख्यांक संमेलन.
६ फेब्रुवारी : आेडिशात २ सभा, तेलंगणात संवाद.
५ फेब्रुवारी : दिल्लीत ७ विद्यार्थ्यांसमवेत डिनर.
३ फेब्रुवारी : पाटण्यात जन आकांक्षा रॅली, यूपीएमध्ये राजद नेते सहभागी.
३१ जानेवारी : दिल्लीत नवीन काँग्रेस टीमशी चर्चा.
३० जानेवारी : तामिळनाडूत तरुण क्रांती यात्रा.
२९ जानेवारी : कोच्चीत रॅली, हिमाचलात कार्यकर्त्यांशी संवाद.
२८ जानेवारी -छत्तीसगडमध्ये शेतकरी आभार रॅली.

बातम्या आणखी आहेत...