आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषण सुरू असताना अचानक रडू लागल्या महिला काँग्रेस उमेदवार, म्हणाल्या- मी तुमच्यासाठी सरकारी नोकरी सोडून आलीये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


व्हिडिओ डेस्क- उत्तर प्रदेशच्या आग्राच्या महिला काँग्रेस उमेदवाराचा भर भाषणात रडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस उमेदवार प्रीता हरित यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपली सरकारी नोकरी सोडली आहे. त्या म्हणाल्या- माझ्या वडिलांनीही निवडणूक लढवण्यासाठी नोकरी सोडली होती. तिकीट मिळाले नाही म्हणून सात वर्षे बेरोजगार होते.


बुधवारी आग्रामध्ये कँग्रेसची एक सभा सुरू होती, तेव्हा कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. त्यांच्या गोंधळामुळे प्रीता हरित खूप त्रस्त झाल्या. प्रीता हरित भाषण देतेवेळेस रडू लागल्या, म्हणाल्या- मी जन्मजात काँग्रेसी आहे, माझे आजोबादेखील काँग्रेसमध्ये होते. मी येथे तुमच्या मदतीसाठी आले आहे. त्या बोलत असताना लोकांनी ताळ्या वाजवल्या तेव्हा त्यांनी लोकांना थांबवले. प्रीता हरित यांचा रडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.